Lokmat Sakhi >Food > हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम 

हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम 

What is the secret of crispy dosa : मसाला डोसा बनवताना अनेकदा डोशांचं पीठ जास्त पातळ होतं त्यामुळे डोशे व्यवस्थित निघत नाही, तव्याला चिकटतात, तर कधी कुरकुरीतपणा येत नाही अशी अनेकींची तक्रार असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:27 PM2023-04-24T17:27:33+5:302023-04-24T18:18:55+5:30

What is the secret of crispy dosa : मसाला डोसा बनवताना अनेकदा डोशांचं पीठ जास्त पातळ होतं त्यामुळे डोशे व्यवस्थित निघत नाही, तव्याला चिकटतात, तर कधी कुरकुरीतपणा येत नाही अशी अनेकींची तक्रार असते.

What is the secret of crispy dosa : How to cook the perfect masala dosa | हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम 

हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम 

इडली, डोसा, मेदूवडा असे पदार्थ नाश्त्याला खाण्यासाठी सर्वांनाच आवडतात. दक्षिण भारतीय पदार्थ नाश्त्याला जास्तीत जास्त खाल्ले जातात. (What is the secret of crispy dosa) कधीतरी हे पदार्थ घरी बनवायचं म्हणलं की हॉटेलसारखी चव घरच्या पदार्थांना येत नाही म्हणून बरेच लोक बाहेरच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. (How to make perfect dosa)

परफेक्ट टिप्स माहित करून घेतल्या तर घरीसुद्धा परफेक्ट चवीचे पदार्थ तयार करता येतात. मसाला डोसा बनवताना अनेकदा डोश्याचं पीठ जास्त पातळ होतं त्यामुळे डोशे व्यवस्थित निघत नाही, तव्याला चिकटतात, तर कधी कुरकुरीतपणा येत नाही अशी अनेकींची तक्रार असते. परफेक्ट, क्रिस्पी मसाला डोसा बनवण्याची सोपी रेसेपी पाहूया. (How to cook the perfect dosa) 

हे डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका भांड्यात  एक वाटी रवा, एक वाटी पातळ पोहे, २ ते ३ मिरच्या, २ चमचे दही, १ चमचा जीरं, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पेस्ट तयार करून घ्या. हे मिश्रण जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असून नये. अन्यथा डोसे व्यवस्थित येणार नाहीत. तव्याला तेल लावून घ्या. तेल गरम झाल्यानंतर त्यावर डोश्याचं पीठ घालून गोलाकार फिरवून घ्या. डोसा तयार झाल्यानंतर  दुसऱ्या बाजूनं फिरवून शिजवून घ्या. दोन्ही बाजूंनी डोसा  शिजल्यानंतर त्यावर बटाट्याची भाजी घालून डोसा जुमडून घ्या. 

भाजलेल्या टोमॅटोची चमचमीत चटकदार चटणी; साध्या जेवणाची वाढेल रंगत

कुरकुरीत डोसा बनण्यासाठी थोडे अधिक तेल घाला आणि मंद आचेवर ते सोनेरी तपकिरी होईपर्यंत जास्तवेळ शिजवा. नंतर दुसऱ्या बाजूला फ्लिप करा. डोश्याचं पीठ जास्त पातळ झालं असेल तर रवा किंवा तांदळाचे पीठ घाला, रवा घातल्याने डोसा खमंग होईल आणि सुंदर रंग देखील येईल. काही लोक पिठात साखर घालतात. डोश्याला छान रंग येण्यासाठी पिठात १ ते २ चमचे साखर मिसळू शकता. 

डोशांसाठी उत्तम तांदूळ कोणते

डोसा बनवण्यासाठी आंबेमोहर तांदूळ वापरला जातो. डोशांचं पीठ योग्य प्रकारे आंबवून आणि शिजवून, तुम्ही सर्वोत्तम डोसा बनवू शकता. नारळाची चटणी, टोमॅटोची चटणी किंवा सांभारबरोबर खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Web Title: What is the secret of crispy dosa : How to cook the perfect masala dosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.