Join us  

टपरीसारखा चहा घरी करण्याचं 'सोपं सिक्रेट'; कडक-जाडसर चहा, एक घोट घेताच मन होईल तृप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 12:01 PM

What is The Secret to Making Good Tea : कधी चहा गोड होतो तर कधी जास्त पातळ. परफेक्ट चहा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make a Perfect Cup of Tea at Home)

भारतात चहाचे शौकीन असलेले बरेच लोक असतात. तरूणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच चहा प्यायला खूप आवडतो. प्रत्येक घरांत वेगवेगळ्या पद्धतीनं चहा बनवला जातो. (Cooking Hacks & Tips) बाहेरच्या  गाड्यांवर, चहाच्या दुकानांमध्ये किंवा तुम्ही कोणाच्या घरी पाहूणे म्हणून  गेल्यानंतर चहा प्यायलात तर प्रत्येकाच्या हातच्या चहाची चव वेगळी असते. रोज चहा बनवण्याची सवय असेल तरी अनेकदा परफेक्ट रिजल्ट येत नाही. मनासारखा चहा बनत नाही. कधी चहा गोड होतो तर कधी जास्त पातळ. परफेक्ट चहा बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How to Make a Perfect Cup of Tea at Home)

हाय फ्लेमवर चहा उकळा

चहा बनवताना सगळ्यात आधी या गोष्टीची काळजी घ्यावी गॅस उच्च आचेवर असावा. गॅसवर  भांडं ठेवल्यानंतर जर तुम्ही थंड भांड्यात चहा घालता तर चहाची चव बिघडते आणि लागतो. म्हणून पाणी उकळल्यांतर आलं, वेलची आणि चहा पावडर घाला. हाय फ्लेमवर पाणी गरम झाल्यानंतर गॅस कमी करा. उकळ आल्यानंतर वेलची आणि आलं घाला.

कांदापोहे कोरडे तर कधी गचगचीत होतात? १ सोपी पद्धत वापरून करा मऊ-मोकळे, चवदार पोहे

चहा पावडर जास्त उकळवू नका

चहा बनवताना चहा पावडर जास्त उकळू देऊ नका आणि चहा पावडर जास्त घालू नका.  अनेकजण चहा गॅसवरच उकळायला ठेवतात आणि उकळत्या पाण्यात चहा पावडर घालतात आणि जास्तवेळ शिजवतात. यामुळे चहाची चव बिघडू शकते.  चहाची चव बिघडू नये यासाठी पाणी उकळ्यानंतर गॅस बंद करा आणि चहा पावडर घालून पॅनने झाकून ठेवा. असं केल्याने चहाची चव दुप्पटीने वाढेल.

दूधाबरोबर साखर घालू नका

चहाच्या उत्तम चवीसाठी कधीच दूधाबरोबर साखर घालू नका यामुळे चहा पातळ होतो आणि चहाचा टेक्सचर बिघडू शकते. तेव्हा तुम्ही चहा पावडर घालता त्याचवेळी साखर घाला. यामुळे चहाला चांगला फ्लेवर येईल आणि चहा अधिक टेस्टी लागेल.

कोणत्याही पदार्थ चुकून मीठ जास्त पडलं तर? ५ टिप्स, खारटपणा होईल गायब- कळणारही नाही मीठ जास्त होतं!

सगळ्यात शेवटी दूध घाला

चहा बनवताना नेहमी सर्वात शेवटी दूध घाला. आधी दूध घातल्याने तुपाचा थर जमा होतो. यामुळे चहाची चव बिघडते. म्हणून सर्वात शेवटी दूध घाला. जर तुम्हाला कडक चहा बनवायचा असेल तर या ट्रिक्स नेहमी लक्षात ठेवा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न