चपाती हा भारतीय घरात रोज खाल्ला जाणारा पदार्थ आहे. तरीही प्रत्येक घरातील चपाती चवीला आणि दिसायला वेगवेगळी असते. साहाजिकच प्रत्येकाची चपाती करण्याची पद्धत वेगळी असल्यानं हा बदल दिसून येतो. चपातीचं पीठ मळण्यापासून ते शेकण्यापर्यंत अनेक स्टेप्सचा यात समावेश असतो. (What is the secret to making soft chapatis) चपाती मुऊ, लुसलुशित होण्यासाठी काही सोप्या टिप्स वापरल्या तर जास्त काही न करता स्वयंपाक उत्तम बनतो. चपाती करण्याच्या सोप्या ट्रिक्स समजून घेऊया. (How to make perfect chapati) जेणेकरून चपात्या वातड, कडक न होता गोल, सॉफ्ट होतील.
१) सर्व प्रथम, पीठ चांगले मळले आहे याची खात्री करा. मळ्यानंतर कणिक अर्धा तास बाजूला ठेवा. मग चपात्या करा.
२) चपातीच्या पिठात पाण्याचे आदर्श प्रमाण 2:1 आहे. 2 कप पीठात 1 कप पाणी आवश्यक आहे. पण वेगवेगळ्या ब्रँडच्या पीठांचे प्रमाण धान्यांच्या रचनेनुसार बदलू शकते. त्यामुळे आवश्यकतेनुसार थोडे जास्त पाणी घेऊ शकता.
३) चपाती व्यवस्थित फुगण्यासाठी कणकेचा गोळा हलका हाताने आणि समान रीतीने लाटून घ्या
४) चपाती लाटताना जास्त पीठ लावू नका. कणीक व्यवस्थित मळून घेतली आणि मळल्यानंतर थोडावेळ बाजूला ठेवली तर जास्त मेहनत न करताच चांगली चपाती लाटता येईल.
५) चपाती भाजणयासाठी तव्यावर घालण्यापूर्वी तवा चांगला गरम करून घ्या. चपाती थोडीशी सेट होताच पहिली उलटी करा.
६) गॅसची फ्लेम नेहमी हाय असावी. जर चपाती थंड तव्यावर आणि मंद आचेवर शिजवली तर ती घट्ट होऊन कोरडी पडते.
७) थेट आचेवर चपाती शिजवल्याने फुलक्यांप्रमाणे मऊ बनते.
८) चपात्यांसाठी शक्यतो लोखंडी तव्याचा वापर करा.