सकाळी घाईघाईत टिफिन करण्याच्या विचारात असताना भाज्या काय करायच्या तेच कळतं नाही. अशावेळी कोणत्याही भाजीसाठी चालेल अशी ग्रेव्ही आधीच फ्रिजमध्ये तयार करून ठेवली तर तुमचा स्वयंपाकाचा वेळ दुपट्टीनं वाचेल. (Cooking Tips) बटाटा, कोबी, फरसबी, भेंडी, शिमला मिरची, वांगी कोणत्याही भाजीसाठी तुम्हाला ही ग्रेव्ही वापरता येईल. ही सोपी रेसेपी बनवण्यासाठी तुम्हाला अर्धा तासापेक्षाही कमी वेळ लागेल. (Cooking Tips and Tricks)
ग्रेव्ही बनवण्यासाठी सगळ्यात आधी कांदे बारीक चिरून घ्या. एका कढईत तेल गरम करून तेलात वेलची, तमालपत्र, लवंग, दगड फूल, धणे जीरं, दालचिनी हा खडा मसाला परतून घ्या. मसाला जळणार नाही याची काळजी घ्या नंतर यात कांद्याचे काप घाला.कांदे परतून घेतल्यानंतर त्यात वाटीभर बारीक पेस्ट केलेलं आलं, लसणाची पेस्ट, कोथिंबीर घालून एकजीव करा. नंतर टोमॅटोचे बारीक काप आणि मीठ घाला. (How to Make Gravy With Recipe Restaurant-Style Gravy)
लाल मिरच्या काही वेळासाठी पाण्यात भिजवून ठेवा नंतर भिजवलेल्या मिरच्यांची पेस्ट करून मिक्सरला फिरवून घ्या. ही पेस्ट कढईत घाला, त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला घालून एकजीव करून घ्या. ही ग्रेव्ही सतत ढवळत राहा जेणेकरून कढईला चिकटणार नाही. यावर कसुरी मेथी घाला. ग्रेव्ही आणखी थोडावेळ झाकण ठेवून शिजू द्या. या मिश्रणाला तेल सुटल्यानंतर गॅस बंद करा.
हॉटेलसारखा मसाला डोसा घरीच करण्याची सोपी रेसिपी- कुरकुरीत आणि चविष्ट डोसा खा पोटभर
थंड झाल्यानंतर ग्रेव्ही एका स्वच्छ, हवाबंद डब्यात भरून घ्या. डबा ओलसर नसावा अन्यथा गेव्ही लवकर खराब होईल. कोणतीही भाजी बनवण्यासाठी कढईत ही ग्रेव्ही घालून त्यात गरम पाणी घालून तुम्ही पनीरचे तुकडे, बटाटे किंवा फ्लॉवर शिजवू शकता. इस्टंट भाज्या तयार होतील.
उन्हाळ्यात भूक कमी झाली तर करा कांदा-टोमॅटोची झणझणीत चटणी, चव अशी की भूक खवळेल
टोमॅटोची ग्रेव्ही भारतीय घराघरात आवडते. फक्त एक टोमॅटो घालून तुम्ही ग्रेव्ही स्वादिष्ट बनवू शकता. आपण कोणत्याही भाजीसाठी टोमॅटो ग्रेव्ही बनवताना त्यात थोडी साखर, दही आणि कसुरी मेथी वापरा. लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला आणि हळद मसाल्यात मिसळून ग्रेव्ही बनवा. टोमॅटोची ग्रेव्ही बनवताना ग्रेव्ही थोडी घट्ट राहण्यासाठी शेवटी ब्रेड पावडर मिसळा. आता ही ग्रेव्ही भाज्यांमध्ये वापरा.