आपल्या आहारामध्ये विविध पदार्थांचा समावेश असतो. रोज काहीतरी वेगळा पदार्थ जरी तयार केला तरी काही सामग्रीही सारखीच वापरली जाते. (What kind of salt should be in the diet and in what quantity? See what experts say)एक पदार्थ असा आहे जो वापरल्याशिवाय आपण जेवण करुच शकत नाही. तो पदार्थ म्हणजे मीठ. भाजी, आमटी, कोशिंबीर काहीही केले तरी मीठ वापरावे लागतेच. त्याशिवाय जेवणाला चव येत नाही. तिखट - हळद पुढे मागे चालते मात्र मीठ योग्य प्रमाणातच पडले पाहिजे. मिठाशिवाय जेवण अळणी लागते. पण मीठामध्येही प्रकार असतात. प्रत्येक प्रकाराची खासियत वेगळी असते. मीठ जेवढे गरजेचे असते. तसेच त्रासदायकही ठरु शकते. (What kind of salt should be in the diet and in what quantity? See what experts say)पाहा तज्ज्ञ काय सांगतात. डॉ. हंसाजी सांगतात, मिठामध्ये विविध प्रकार असतात. प्रत्येकाची गुणवत्ता वेगळी असते.
१. रोजच्या वापरासाठी आपण जे पांढऱ्या रंगाचे मीठ वापरतो. त्यामध्ये आयोडीन असते. शरीरासाठी ते गरजेचे असते. रोजच्या रोज थोडे मीठ पोटात जाणे आवश्यक असते. या मिठाला टेबल सॉल्ट असेही म्हणतात. मिठाचा अति वापर चांगला नाही. मात्र वर्षानुवर्षे याच प्रकारचे मीठ आपण खात आलो आहोत. जगभारात या प्रकारचे मीठ वापरले जाते. शरीरासाठी त्यातील सत्वे गरजेची असतात.
२. हिमालयन मीठ बाजारात मिळते. ज्याला आपण सैंधव मीठ म्हणतो. हे एक नैसर्गिक प्रकारचे मीठ असते. दिसायला छान गुलाबी असणारे हे मीठ पचनासाठी फार चांगले असते. साधारण आयोडिन मीठापेक्षा ते जास्त शुद्ध मानले जाते. त्यामध्ये अनेक पोषकतत्वे असतात. आरोग्यासाठी हे मीठ फार चांगले असते त्याचा समावेश आहारात असला पाहिजे.
३. सेल्टिक मीठ हा प्रकार फ्रान्सच्या ब्रिटनी प्रांतातल्या समुद्रकिनार्यावर पारंपारिक पद्धतीने तयार केला जातो. रंगाला हे मीठ राखाडीसर असते. नैसर्गिक पद्धतीने हे मीठ तयार केले जाते. कोणतीही रासायनिक प्रक्रिया केल्याशिवाय मीठ तयार केले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे असतात. स्वयंपाकासाठी हे मीठ वापरणे शरीरासाठी फायद्याचेच असते.
आहारामध्ये योग्य प्रमाणामध्ये या तिन्ही प्रकारच्या मिठांचा समावेश असणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. मीठ हा रोजच्या वापराचा पदार्थ असल्याने त्याबद्दल योग्य माहिती असणे गरजेचे आहे.