Lokmat Sakhi >Food > मसाल्याच्या डब्यात ठेवायलाच हव्यात ५ गोष्टी, फोडणीची वाढेल रंगत, पदार्थ होतील चविष्ट

मसाल्याच्या डब्यात ठेवायलाच हव्यात ५ गोष्टी, फोडणीची वाढेल रंगत, पदार्थ होतील चविष्ट

What Spices go in Masala Box :

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 02:19 PM2022-12-16T14:19:29+5:302022-12-16T15:53:13+5:30

What Spices go in Masala Box :

What Spices go in Masala Box : Include this food in your masala box Cooking will become tasty | मसाल्याच्या डब्यात ठेवायलाच हव्यात ५ गोष्टी, फोडणीची वाढेल रंगत, पदार्थ होतील चविष्ट

मसाल्याच्या डब्यात ठेवायलाच हव्यात ५ गोष्टी, फोडणीची वाढेल रंगत, पदार्थ होतील चविष्ट

जेवण स्वादीष्ट तितकंच रुचकर चवीचं होण्यात मसाल्यांची महत्वाची भूमिका असते. महाराष्ट्रात प्रांतानुसार वेगवेगळ्या ठिकाणची खासियत असलेले मसाले  स्वयंपाकात वापरले जातात.  सर्व मसाले वेगळ्या भांड्यात ठेवणयाऐवजी एकाच डब्यात  ठेवणे अधिक सोयीचे असते. त्यासाठी इकडे तिकडे धावपळ करावी लागत नाही  श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात. मसाल्याच्या डब्यात कोणते पदार्थ असायलाच हवेत ते या लेखात पाहूया. ( Include this food in your masala box Cooking will become tasty)

1) राई , जीरं, बडीशेप/ मेथी, लाल मिर्च पाउडर, धणे पाउडर, हळदी पावडर, मीठ, हिंग हे बेसिक पदार्थ मसाल्याच्या डब्यात असायलाच हवेत.

2) यात तुम्ही खडा मसाला, आगरी मसाला,  गरम मसाला, मालवणी मसाला, घाटी मसाला.. इ प्रकारचे मसाले तुमच्या आवडीनुसार त्यात अॅड करू शकता.

थंडीत भाकरीबरोबर खा झणझणीत, चवदार पिठलं; अस्सल गावरान चवीची रेसेपी, पाहा...

3) कसुरी मेथी, आमसूल पावडर, सुकलेल्या लाल मिरच्यासुद्धा जेवणाची रंगत वाढवतात. मसाल्याच्या डब्यात सुकलेल्या लाल मिरच्या किंवा त्याची जाडसर पावडर करून ठेवा.

४) स्टीलच्या डब्यात मीठ ठेवल्यानं वातावरणातील आर्द्रता जास्त असल्याने गंजण्याची शक्यता जास्त असते, म्हणून  मीठ काचेच्या भांड्यात ठेवा.

५) तुम्ही लाकडाचा डबासुद्धा मसाल्यांसाठी वापरू शकता. हे सर्व मसाले लाकडी डब्यात ठेवावेत. यामुळे मसाल्यांमध्ये ओलसरपणा किंवा बुरशी येत नाही. 

Web Title: What Spices go in Masala Box : Include this food in your masala box Cooking will become tasty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.