Join us  

आलू पराठा करताना सारण सैल झाले, बटाटे खूप उकडले? ३ टिप्स- पराठा जमेल परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2023 2:11 PM

3 Tips For Making Perfect Aloo Paratha: पराठे करायला गेलं की असं अनेकदा होतं आणि मग सगळाच पचका होतो... म्हणून पुढच्या वेळी पराठे करताना असं झालं तर या ३ गोष्टी लक्षात ठेवा. (What to do if aloo paratha stuffing is soggy?)

ठळक मुद्देपराठा लाटायला गेला की तो फुटतो, पोळपाटाला- लाटण्याला चिटकतो आणि मग सगळाच पसारा होतो. म्हणून सारण जर सैलसर झालं तर काय करायचं, याच्या ३ टिप्स पाहून घ्या.

बटाट्याचे पराठे हा बहुतांश घरांमध्ये अगदी आवडीने, चवीने खाल्ला जाणारा पदार्थ. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पराठे आवडतात. कधी नाश्त्याला पराठे केले जातात तर कधी रात्रीच्या जेवणातही बटाट्याचे पराठे असतात. बटाट्याचे पराठे खाण्याची मजा मात्र तेव्हाच असते, जेव्हा त्यातलं सारण चवदार असतं आणि ते पराठ्याच्या अगदी कोपऱ्यापर्यंत समान पसरलेलं असतं. बऱ्याचदा मात्र असं होतं की बटाटे जास्त उकडले जातात आणि मग त्यामुळे पराठ्याचं सारण जरा सैलसर होतं (if aloo paratha stuffing is soggy). सारण जर सैलसर झालं तर मात्र पराठे अजिबात व्यवस्थित लाटता येत नाहीत (what to do if aloo paratha breaks?). पराठा लाटायला गेला की तो फुटतो, पोळपाटाला- लाटण्याला चिटकतो आणि मग सगळाच पसारा होतो. म्हणून सारण जर सैलसर झालं तर काय करायचं, याच्या ३ टिप्स पाहून घ्या.(3 tips for making perfect aloo paratha)

 

आलू पराठा करताना सारण सैलसर झालं तर......१. आलू पराठा करताना सारण सैलसर झालं तर ते सारण काही वेळ एका स्वच्छ सुती कपड्यावर पसरवून ठेवा. असं केल्यामुळे कपडा पराठ्यामधलं अतिरिक्त पाणी शोषून घेईल.

करिना कपूरचा २१ हजारांचा पान पट्टी सलवार कुर्ता!! हा कोणता प्रकार आणि काय त्याची खासियत?

एक कपडा ओलसर झाला आणि तरीही सारण सैलसर असेल तर पुन्हा दुसरा कपडा घ्या आणि त्यावर सारण पसरवून ठेवा. असं केल्याने सारणाचा ओलसरपणा कमी होईल आणि ते घट्ट होईल.

 

२. दुसरा उपाय म्हणजे एका ताटात सारण पसरवून ठेवा आणि हे ताट साधारण एका तासासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.

पावसाळ्यात घरात भिंतीवर पालीची पिल्ले दिसतात? फक्त २ पदार्थ, हा उपाय करा पाली गायब 

ताट फ्रिजमध्ये ठेवल्यावर त्यावर झाकण ठेवू नका. एका तासाने सारण काहीसं घट्ट झालेलं असेल. त्यामुळे सरसर पराठे लाटता येतील. 

 

३. यावर करता येण्यासारखा आणखी एक उपाय म्हणजे अशावेळी कणिक जरा जास्त घट्ट भिजवा. कणकेचा उंडा किंवा गोळा मोठा घ्या, त्यात सारण थोडंसंच टाका आणि मग पराठा लाटा.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती