उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्नाची फार नासाडी होते. दूध नासते तसेच भाजी लवकर खराब होते. चपाती कडक होते. इतरही पदार्थ खराब होतात. (What to do if curd turns sour and thin? 2 easy solutions)अन्न फ्रीजमध्ये ठेवल्यावर वाया जात नाही. तसेच दीर्घकाळ टिकते. घरी आपण विरजण करुन दही लावतो. दही छान गोड लावता येणे म्हणजे एक कलाच आहे. (What to do if curd turns sour and thin? 2 easy solutions)छान घट्ट, मऊ असे दही लावता आले की मग मनालाही समाधान मिळते.
बरेचदा फ्रीजमध्ये ठेवले तरी दही आंबट होते. (What to do if curd turns sour and thin? 2 easy solutions)असे आंबट दही अजिबात खावेसे वाटत नाही. तसेच बरेचदा दही घट्ट लागत नाही. पाण्यासारखे पातळच राहते. त्या दह्याचा वापरही करता येत नाही. दही आंबट झाल्यावर काय कराल तसेच दही नीट घट्ट लागलेच नाही तर काय कराल हे जाणून घेण्यासाठी या टिप्स वाचा.
दही आंबट झाल्यावर काय कराल?
दही आंबट होते मग ते एकतर टाकावे लागते किंवा मग त्याची आपण कढी करतो. इतर काही पदार्थ करतो. मात्र एक अगदी सोपा उपाय आहे ज्यामुळे दह्याचा आंबटपणा कमी करता येतो. दोन मिनिटेही लागत नाहीत. तसेच फक्त पाण्याचा वापर करुन हा उपाय करता येतो. आंबट झालेले दही अलगद फ्रिजमधून काढा. त्याच्या वरील सायीचा जाड भाग काढून टाका. वरचा एक थर काढा तो वापरू नका. नंतर दह्यामध्ये पाणी ओता. ते अजिबात डिवचू नका जरा वरतून पाणी ओता. भांड हातात घेऊन जरा हलवा ते पाणी काढून टाका. नंतर पुन्हा दोन ते तीन वेळा असेच करा. नंतर एकदा पाणी घ्या आणि दह्यातून हलकासा चमचा फिरवा आणि ते पाणी पटकन ओतून टाका. दह्याचा आंबटपणा एकदम कमी होतो.
दह्याला घट्टपणा आलाच नाही पाणचटच राहीले तर काय कराल?
दही रात्रभर ठेवले तरी सकाळी पाणचटच राहते. मग ते दही खाण्यासारखे राहतच नाही. आणि तसेच अजून थोडावेळ ठेवले तरी त्याला घट्टपणा येत नाही. अशावेळी अगदीच सोपा उपाय करुन दही मस्त घट्ट करता येते. एका मोठ्या खोलगट पातेल्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यामध्ये दह्याचे भांडे व्यवस्थित ठेवा. त्यामध्ये अर्धा चमचा विरजण घाला. व्यवस्थित ढवळा. किमान २० वेळा तरी चमच्याने ढवळा. नंतर त्यावर झाकण ठेवा. ३ ते ४ तासांमध्ये मस्त घट्ट दही खायला मिळेल.