Lokmat Sakhi >Food > मेदूवड्याचं पीठ सैल झालं, तेलात सोडताना वड्याचा आकार बिघडतो? ३ टिप्स- मेदूवडा होईल परफेक्ट कुरकुरीत

मेदूवड्याचं पीठ सैल झालं, तेलात सोडताना वड्याचा आकार बिघडतो? ३ टिप्स- मेदूवडा होईल परफेक्ट कुरकुरीत

What to do if Medu Vada Batter becomes Watery : डोनटसारखे तयार होतील कुरकुरीत साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडे, फक्त करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2024 10:10 AM2024-02-09T10:10:10+5:302024-02-09T10:15:01+5:30

What to do if Medu Vada Batter becomes Watery : डोनटसारखे तयार होतील कुरकुरीत साऊथ इंडियन स्टाईल मेदूवडे, फक्त करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी..

What to do if Medu Vada Batter becomes Watery ? | मेदूवड्याचं पीठ सैल झालं, तेलात सोडताना वड्याचा आकार बिघडतो? ३ टिप्स- मेदूवडा होईल परफेक्ट कुरकुरीत

मेदूवड्याचं पीठ सैल झालं, तेलात सोडताना वड्याचा आकार बिघडतो? ३ टिप्स- मेदूवडा होईल परफेक्ट कुरकुरीत

साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली, डोसा, अप्पम, अप्पे आणि कुरकुरीत मेदूवडे (South Indian Dishes) फार फेमस आहे. काही लोकं अण्णाच्या स्टॉलवर जाऊन नाश्त्यामध्ये एक प्लेट इडली - मेदूवडा खातात. गोल गरगरीत गरमागरम मेदू वडे खाल्ल्याने पोट टम्म भरते. शिवाय लंचच्या वेळेपर्यंत भूकही लागत नाही. पण घरी तयार करायला घेतल्यास साऊथ इंडियन स्टाईल मेदू वडे तयार होत नाही. कधी साहित्यांच्या प्रमाणामध्ये चूक होते, तर कधी डाळ दळताना गडबड होते. ज्यामुळे मेदूवडे क्रिस्पी व आकाराने डोनटसारखे तयार होत नाही.

उडदाची डाळ नीट वाटली गेली नाही, किंवा त्यात पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास बॅटर पातळ होते (Medu Vada). त्यामुळे मेदूवडे करताना फसतात. शिवाय क्रिस्पी नसून मऊ तयार होतात आणि जास्त तेल पितात (Cooking Tips). मेदूवडे करण्यासाठी लागणारं बॅटर जर गुळगुळीत आणि पातळ झालं असेल तर, काय करावे? मेदूवडे क्रिस्पी होण्यासाठी कोणत्या टिप्स उपयुक्त ठरतील? पाहूयात(What to do if Medu Vada Batter becomes Watery).

तुरीचे वरण खातो पण डोसा? खा तूरडाळीचा पौष्टिक डोसा - पीठ न आंबवता करा झ्टपट डोसे

मेदूवडे करताना लक्षात ठेवा ३ टिप्स

- मेदूवड्यासाठी आपण जेव्हा उडदाच्या डाळीचे पीठ दळतो, तेव्हा सतत पाणी घालू नका. त्याऐवजी डाळीवर पाणी शिंपडा. यामुळे पीठ जास्त पातळ होणार नाही.

- मेदूवडे तयार करण्यासाठी पीठ दळताना सुरुवातीला मीठ घालू नका. उडीद डाळ पूर्णपणे दळून झाल्यानंतर शेवटी मीठ घाला. सुरुवातीला मीठ घातल्यास पीठ पातळ होण्याची शक्यता जास्त असते.

उरलेल्या शिळ्या भाताचा करा मऊ जाळीदार ढोकळा, इन्स्टंट ढोकळा रेसिपी - करा झटपट नाश्ता

- जर भिजवलेली उडीद डाळ वाटून झाल्यानंतर बॅटर पातळ झालं असेल तर, त्यात दीड चमचे तांदुळाचं पीठ, दीड चमचे उडीद डाळीचे पीठ घालून मिक्स करा. त्यानंतर ३० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा. जेणेकरून मेदूवडे तळल्यानंतर छान फल्फी तयार होतील.

Web Title: What to do if Medu Vada Batter becomes Watery ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.