Join us  

दिवाळीत केलेले बेसनाचे लाडू उरलेत? लाडवांचा करा एक खास पदार्थ, अतिशय सोपा आणि चवदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2022 7:36 PM

Food And Recipe: दिवाळीत केलेले बेसन लाडू अजूनही उरले असतील, तर ते खराब होण्याआधी त्या लाडवांपासून हा एक चवदार पदार्थ करून टाका. चटकन संपून जातील लाडू (Puran poli from leftover besan ladoo).

ठळक मुद्दे तुमच्याही घरी दिवाळीच्या फराळातले बेसनाचे लाडू उरले असतील, तर त्यापासून ही खास पुरणपोळी तयार करा.

दिवाळीचा फराळ आपण तसा जरा जास्तीचाच करतो. जेणेकरून तो आपल्यालाही मनसोक्त खाता येईल आणि शेजाऱ्यांना, मित्रमंडळींना, नातलगांनाही वाटता येईल. आपण जसा इतरांना फराळ वाटतो, तसेच दुसऱ्यांच्या घरातली फराळाची पाकीटंही आपल्या घरी येतात. त्यामुळे मग घरी भरपूर फराळ (diwali faral) जमा होतो. काही दिवसांनी हे फराळाचे पदार्थ खाणं जिवावर येतं आणि मग उरलेल्या पदार्थांचं काय करावं, हे समजत नाही. आता तुमच्याही घरी दिवाळीच्या फराळातले बेसनाचे लाडू उरले असतील (Puran poli from leftover besan ladoo), तर त्यापासून ही खास पुरणपोळी तयार करा. ही रेसिपी Ruchkar Mejwani या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे.

 

उरलेल्या बेसन लाडूंची पुरणपोळीसाहित्य५ ते ६ मध्यम आकाराचे बेसन लाडू१ टेबलस्पून तूप

अभिनेत्री यामी गौतमने केला बनाना केक, लाडक्या भाच्यासाठी तिने केलेल्या केकची बघा खास रेसिपी२ ते ३ टेबलस्पून गूळ१ टीस्पून जायफळ पावडरसाधारण अर्धा ते पाऊण वाटी पाणी

 

कृती१. गॅसवर एक कढई गरम करायला ठेवा.

२. कढई गरम झाली की त्यात तूप टाका. तूप विरघळले की त्यात बेसनाचे लाडू कुस्करून टाका.

इन्स्टंट नूडल्स करताना लक्षात ठेवा ३ खास गोष्टी, नेहमीच्याच नूडल्स होतील आणखी चवदार!

३. तूप आणि लाडू चांगले परतून घेतले की त्यात गूळ टाका. सगळे मिश्रण पुन्हा एकदा हलवून घ्या. सुरुवातीला या मिश्रणाला तूप सुटेल आणि ते पातळ होईल. पण त्यानंतर पुन्हा घट्ट होत जाईल.

४. मिश्रण घट्ट होऊ लागले की त्यात पाणी टाका. साधारणपणे पुरण जसं असतं, त्या पद्धतीचे हे मिश्रण करायचे आहे. त्यामुळे त्या हिशोबाने पाण्याचे प्रमाण कमी- जास्त लागू शकते. पाणी टाकल्यावर जायफळ टाका.

५. जेव्हा मिश्रण कढईला चिटकणार नाही, तेव्हा आपले बेसनाने पुरण झाले आहे, असे समजा.

६. ते थंड झाले की पुरणाप्रमाणे कणकेच्या गोळ्यात भरून त्याच्या पोळ्या लाटा. तव्यावर खरपूस भाजून घ्या. आणि तूप टाकून गरमागरम खा. छान चवदार लागतील. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दिवाळी 2022