तळलेले पदार्थ कमीतकमी प्रमाणात खावे असं आपण नेहमीच ऐकतो. पण डोक्याला हे पटत असलं तरी जिभेला मात्र ते फारसं रुचत नाही. त्यात आता पावसाळा सुरू आहे. त्यामुळे बाहेर आभाळ दाटून आलं, पावसाची रिमझिम सुरू झाली की वडे, भजी असं काहीतरी खमंग तळून खावं वाटतंच. पदार्थ तळून झाले की मग मात्र उरलेल्या तेलाचं काय करावं, हा प्रश्न पडतो (what to do with the leftover oil after deepfrying). कारण हे तेल पुन्हा पुन्हा वापरणं आरोग्यासाठी हानिकारक आहे, हे आपण ऐकलेलं असतं. सध्या तेलाचे भाव एवढे आहेत की ते टाकूनही द्यावे वाटत नाही (how can we reuse oil safely?). म्हणूनच तुम्हीही ते तेल खावं की टाकून द्यावं या द्विधा मनस्थितीत अडकला असाल तर डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला एकदा ऐकून घ्या.. (how to reuse deep frying oil?)
तळून झाल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करावं?
कोणताही पदार्थ तळून झाल्यानंतर जे तेल कढईमध्ये उरतं ते तेल तुम्ही पुन्हा एक- दोन दिवसांनी एखादा दुसरा पदार्थ तळण्यासाठी वापरत असाल तर तुम्ही चुकत आहात. कारण असं एकच तेल वारंवार त्याच्या बॉईलिंग पॉईंटला आणल्याने ते आपल्यासाठी विषारी ठरतं.
डोक्यात सतत नको ते विचार येतात? छोट्या गोष्टींचाही ताण येतो? मन शांत होण्यासाठी बघा उपाय
त्यामुळे असं पुन्हा पुन्हा तळण्यासाठी ते तेल अजिबात वापरू नका. त्याऐवजी तुम्ही ते पोळ्यांसाठी, थालिपीठांसाठी, एखाद्या पदार्थावर तसंच टाकून खाण्यासाठी किंवा भाजी, वरण यांना फोडणी देण्यासाठी वापरू शकता. पण असं तेल जास्तीतजास्त ३ ते ४ दिवसच वापरावं, त्यानंतर मात्र ते फेकून द्यावं असा सल्ला डॉक्टरांनी drasrani_india या इन्स्टाग्राम पेजवर दिला आहे.
हे पर्यायही बघा..
तळल्यानंतर उरलेलं तेल वरीलप्रमाणे ३ ते ४ दिवस वापरूनही संपलं नाही तर त्याचं काय करावं असा प्रश्न पडतो. ते तेल फेकून द्यावं वाटत नसेल तर त्याचा दुसऱ्या कामांसाठी तुम्ही उपयोग करू शकता.
इंस्टंट नूडल्स खाऊन मुलं होतात लठ्ठ? घरीच करा आटा नूडल्स, कणकेच्या नूडल्स बनविण्याची भन्नाट ट्रिक
ते तेल गाळून घ्या आणि एखाद्या बाटलीत भरून ठेवा. सध्या पावसाळ्याच्या दिवसांत दरवाजे, खिडक्या, ड्रॉवर बऱ्याचदा घट्ट होतात. त्यांना वंगण म्हणून तुम्ही तळलेलं तेल वापरू शकता. लाकडी फर्निचरला पॉलिश करायलाही या तेलाचा वापर होऊ शकतो.