Lokmat Sakhi >Food > भजी-वडे तळून उरलेल्या काळपट तेलाचं काय करायचं? तळलेले तेल स्वच्छ करण्याचे 4उपाय

भजी-वडे तळून उरलेल्या काळपट तेलाचं काय करायचं? तळलेले तेल स्वच्छ करण्याचे 4उपाय

तळणाचं तेल काळपट आणि अस्वच्छ झाल्यास ते जास्त असलं तरी फेकून द्यावं लागतं. पण पहिल्या तळणाचं काळपट अस्वच्छ तेल स्वच्छ करण्याचे उपाय आहेत. हे उपाय सहज करता येतील इतके सोपे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 09:06 PM2022-01-28T21:06:00+5:302022-01-28T21:12:04+5:30

तळणाचं तेल काळपट आणि अस्वच्छ झाल्यास ते जास्त असलं तरी फेकून द्यावं लागतं. पण पहिल्या तळणाचं काळपट अस्वच्छ तेल स्वच्छ करण्याचे उपाय आहेत. हे उपाय सहज करता येतील इतके सोपे आहेत.

What to do with the remaining black oil after frying Bhaji-vade? 4 ways to clean fried oil | भजी-वडे तळून उरलेल्या काळपट तेलाचं काय करायचं? तळलेले तेल स्वच्छ करण्याचे 4उपाय

भजी-वडे तळून उरलेल्या काळपट तेलाचं काय करायचं? तळलेले तेल स्वच्छ करण्याचे 4उपाय

Highlightsचहा काॅफीसाठी वापरली जाणारी गाळणी वापरुन तेल स्वच्छ करता येतं.काॅर्न स्टार्च आणि लिंबाच्या फोडीही तळणाचं तेल स्वच्छ करण्यासाठी वापरता येतात.तळणाचं तेल योग्य पध्दतीनं साठवलं नाही तर ते खराब होतं. 

 रोजच्या स्वयंपाकाला तेल आवश्यक असतं. कधी ते नेहमीपेक्षा जास्त लागतं तर कधी नेहमीपेक्षा कमी. पण तेल मात्र लागतंच. वडे भजी तळताना तेल जास्त लागतं. नुसतं तेल लागतं असं नाही तर वडे भजी तळताना तेल अस्वच्छ होतं. खूपच काळपट होतं. एकदा तळण काढलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरु नये असं तज्ज्ञ म्हणतात, ते खरं आहे. पण एकदा तळण काढलेलं तेल हे भाजी फोडणी घालण्यासाठी वापरु शकतं. कारण तज्ज्ञांच्या मते भाजी फोडणी घालताना तळण काढण्याइतकं तेल तापवावं लागत नाही.  म्हणून ते पहिल्या तळणाला वापरलेलं तेल हे भाजी फोडणी घालण्यासाठी वापरु शकतो. पण पहिल्याच तळणात तेल काळपट आणि अस्वच्छ झाल्यास ते जास्त असलं तरी फेकून द्यावं लागतं. पण पहिल्या तळणाचं काळपट अस्वच्छ तेल स्वच्छ करण्याचे उपाय आहेत. हे उपाय सहज करता येतील इतके सोपे आहेत. 

Image: Google

तळणाचं तेल स्वच्छ करताना..

1. तळणाचं तेल स्वच्छ करण्यासाठी आधी ते चांगलं थंड होऊ द्यावं. हे तेल चहा काॅफीच्या गाळणीनं किंवा पेपर टाॅवेलचा उपयोग करुन गाळता येतं. या उपायांनी तेलातले अस्वच्छ, करपलेले कण गाळणीतल्या छिद्रात/ पेपरमध्ये अडकतात. असं तेल तळणासाठी वापरु नये, फक्त भाज्यांच्या फोडणीसाठी वापरावं.

Image: Google

2.  तळणाचं तेल अस्वच्छ असल्यास त्यात काॅर्न स्टार्च घालाव. काॅर्न स्टार्च घातलेलं तेल गॅसवर मंद आचेवर तापवावं. हे तेल  लाकडी चमच्यानं सतत हलवावं. साधारण दहा मिनिटानंतर काॅर्न स्टार्चच मिश्रण खाली बसतं. गॅस बंद करुन तेल थंड होवू द्यावं. थंड झालेलं तेल गाळणीनं गाळून घ्यावं. 

Image: Google

3. अस्वच्छ तेल आधी गरम करायला ठेवावं. लिंबाचे छोटे छोटे तुकडे करुन तेलात टाकावेत. तेलातले अस्वच्छ कण लिंबाच्या फोडींना चिटकतात. लिंबाच्या फोडी मग तेलातून बाहेर काढाव्यात. तेल आणखी स्वच्छ होण्यासाठी ते पुन्हा गाळून घ्यावं. 

Image: Google

4. तळणाचं तेल ओलसरपणा , आजूबाजूला असलेल्या उष्णतेनंही खराब होतं.त्यामुळे तळण झाल्यावर तेल गार होवू द्यावं. ते वरील कोणतीही पध्दत वापरुन स्वच्छ करावं. हे तेल एका भांड्यात किंवा बाटलीत काढून, या तेलाची बाटली स्वच्छ कोरड्या, जास्त प्रकाश येणार, गॅसची उष्णता लागणार  नाही अशा जागी ठेवावी. 
 

Web Title: What to do with the remaining black oil after frying Bhaji-vade? 4 ways to clean fried oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.