Water Melon Seeds : उन्हाळ्यात गारेगार आणि रसदार गुलाबी कलिंगड खाण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. कलिंगडामध्ये शरीर हायड्रेट ठेवणारे आणि शरीरात पाणी संतुलित ठेवण्याचे गुण असतात. इतकंच नाही तर यात कॅलरी कमी असतात आणि फायबर व व्हिटॅमिन्स भरपूर असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कलिंगड खायला तर टेस्टी लागतंच, सोबतच बरेच लोक यातील बियाही खातात. अशात कलिंगडाच्या बिया पोटात जाणं किंवा खाणं फायदेशीर असतं की नुकसानकारक हे जाणून घेऊया.
कलिंगड शरीराला आतून गारवा आणि पाणी देतं. सोबतच आरोग्याला आवश्यक अनेक पोषक तत्वही देतं. यात 90 टक्के पाणी असतं. ज्यामुळे उष्णता वाढल्यावरही शरीर हायड्रेट राहतं. यासोबतच कलिंगडाच्या बिया देखील खूप फायदेशीर मानल्या जातात. यांमध्ये व्हिटॅमिन बी, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, झिंक आणि प्रोटीन असे पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराचा अनेक समस्यांपासून बचाव होतो.
कलिंगडाच्या बिया खाण्याचे फायदे
हृदयासाठी फायदेशीर
कलिंगडाच्या बिया हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यातील गुड फॅट, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3, ओमेगा 6 फॅटी अॅसिड असतं जे हृदय हेल्दी ठेवण्यास मदत करतात.
पचनक्रिया सुधारते
कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. जर तुम्ही कलिंगडासोबत यातील बियाही खाल्ल्या तर शरीरात भरपूर फायबर जाईल. ज्यामुळे पचन तंत्र आणखी मजबूत होईल. पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्याही दूर होतील.
त्वचेसाठीही फायदेशीर
कलिंगडाच्या बियांमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात, जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. यातील गुड फॅटमुळे त्वचेवरील सुरकुत्याही दूर होतात. तसेच त्वचेमध्ये ओलावा कायम राहतो.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
कलिंगडाच्या बियांमध्ये प्रोटीनही असतं. त्यामुळे डायबिटीसचे रूग्ण या बिया खाऊ शकतात. यातील मॅग्नेशिअम देखील फायदेशीर असतं.
एनर्जी वाढते
कलिंगडाया बियांमध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर असतात. जे एनर्जी बूस्ट करतात. त्यामुळे तुम्ही दिवसभर अॅक्टिव राहता.
वजन होतं कमी
कलिंगडाच्या बियांची न्यूट्रिशनल व्हॅल्यू यांना एक जबरदस्त सुपरफूड बनवतं. यात फार कमी कॅलरी असतात. याच्या मुठभर बियांचं खायला हव्या. लो कॅलरी फूड असल्याकारणाने वजन कमी करणाऱ्यांसाठी या बिया फायदेशीर आहेत. लठ्ठपणावर कंट्रोल ठेवून तुम्ही अनेक आजारांपासून वाचू शकता.
कलिंगडाच्या बिया खाण्याची योग्य पद्धत
कलिंगडाच्या बिया काढल्यानंतर एका पसरट भांड्यात ठेवून त्या वाळत घाला. त्या नंतर एका पॅनवर हलक्या भाजा. त्यानंतर त्या एका डब्यात सांभाळून ठेवा. या बियांचा समावेश तुम्ही तुमच्या मॉर्निंग डाएटमध्ये करू शकता. या बीया तुम्ही सॅलड, ओट्स, टोस्ट किंवा दुसऱ्या बीयांसोबतही खाऊ शकता.