Health Tips : साखर वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या जीवनाचा मोठा भाग आहे. चहा, चॉकलेट, वेगवेगळ गोड पदार्थ यांमधून साखर आपल्या शरीरात जाते. जेवढी जास्त साखर तेवढ्या जास्त कॅलरी शरीरात जातात. ज्यामुळे वजन तर वाढतंच, सोबतच डायबिटीसचा धोकाही वाढतो. डायबिटीस हा एक कधीही पूर्णपणे बरा न होणारा आजार आहे. त्यामुळे शुगर कमी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात खूप बदल करावे लागतात. साखर खूप मोठी समस्या निर्माण करते. अशात जर तुम्ही एक महिना साखर खाणं बंद कराल तर अनेक समस्या दूर होतात. काय बदल होतात तेच आज जाणून घेणार आहोत.
वजन कमी होईल
एक महिना जर साखर खाणं बंद केलं तर तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळेल. एक्सपर्ट सांगतात की, आहारात अतिरिक्त शुगर दूर केल्यास २ ते ५ किलो वजन कमी करू शकता. हे तुमचं चयापचय, आहार आणि शारीरिक हालचालीवर अवलंबून असेल. साखरेमुळे कॅलरी अधिक वाढतात आणि पोटाच्या आजूबाजूला चरबीही जमा होते.
शरीर कसं रिअॅक्ट होतं
साखर खाणं सोडल्यावर काही दिवसांच्या आतच तुम्हाला डोकेदुखी, मूड स्विंग आणि थकवा यांसारखी लक्षणं दिसू लागतात. मात्र, एक आठवड्यानंतर तुमच्या ऊर्जेचा स्तर स्थिर होतो आणि साखरेची किंवा गोड खाण्याची लालसा कमी होते. दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचं पचन चांगलं होतं, त्वचा साफ दिसते आणि फोकसही चांगला होतो.
त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यापर्यंत तुमचं शरीर ऊर्जेसाठी शरीरात जमा चरबी जाळणं सुरू करतं. ज्यामुळे वजन कमी होतं. साखर कमी खाल्ल्यानं सूजही कमी होते, ज्यामुळे मधुमेहाचा धोकाही टळतो आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं. एक्सपर्ट साखरेऐवजी फळं खाण्याचा सल्ला देतात. तसेच प्रोटीन आणि फायबर असलेले पदार्थ खाण्याचाही सल्ला देतात.
एकंदर काय तर एक महिना जर तुम्ही साखर खाणं सोडलं तर शरीरात भरपूर बदल बघायला मिळतील. पचनक्रिया मजबूत होईल, वजन कमी होईल, वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी होईल. महत्वाची बाब म्हणजे तुम्ही अनेक वर्ष निरोगी जीवन जगू शकाल.