लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चीज, बटर आवडतं. ब्रेड-बटर, सॅंडविच, पिझ्झा अशा विदेशी पदार्थांवर भरपूर चीज, बटर घालून आवडीने खाल्लं जात. आता याचबरोबर आपल्याकडच्या डोसा, घावन, पोळी यांसारख्या भारतीय पदार्थांना देखील बटर लावून खाण्याचा एक नवा ट्रेंड सुरु झाला आहे. कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्यासाठी अनेकजण त्यात बटर, चीज घालून मग खातात. मग ती डाल मखनी असो, किंवा पाव भाजी, बटर डोसा, किंवा बटर पराठा असो, बटर लावलेले पदार्थ आपण आवडीने ताव मारून खातो.
दुधापासून घुसळून थेट बनविलेल्या लोण्यासारख्या पदार्थाला बटर म्हणतात. किंचित मीठ घातलेले पिवळ्या रंगाचे हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये खूप दिवस टिकते. यामुळे आपण आपल्याला कधी हवे तेव्हा हे बटर रेफ्रिजरेटरमधून काढून आपल्या आवडीच्या पदार्थांसोबत खाऊ शकतो. हे बटर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यामुळे फारच कडक होऊन बसते, ते वापरयाच्या किमान तासभर आधी फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे लागते. कधी आपण हे बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवायला विसरलो तर तसेच कडक बटर वापरणे अशक्य होते. अशावेळी एक सोपा घरगुती उपाय करून आपण हे बटर सहजरित्या वापरू शकतो(What's the Best Way to Soften Frozen Butter).
नक्की काय उपाय करता येऊ शकतो?
बटर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्याकारणारे ते फारच कडक होते. जर आपल्याला कोणत्या पदार्थामध्ये बटरचा वापर करायचा असल्यास किमान तासभर आधी फ्रिजमधून बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला येण्यासाठी ठेवावे लागते. कधी कधी आपण कामाच्या गडबडीत हे बटर फ्रिजमधून बाहेर काढायला विसरतो. अशा परिस्थिती ते वापरायचे असल्यास आपण लगेच त्याला गॅसवर गरम करून वितळवण्याचा प्रयत्न करतो परंतु असे केल्यास बटर वितळण्याऐवजी करपून खराब होते. असे अर्धवट वितळलेले बटर आपण इतर पदार्थांमध्ये देखील नीट वापरू शकत नाही. तसेच घाई गडबडीच्या वेळी आपल्याकडे इतका वेळ ही नसतो की आपण बटर वितळेपर्यंत त्याची वाट बघू शकू. यावेळी आपण एक सोपी ट्रिक वापरून या कडक बटरचा वापर करू शकतो.
रेफ्रिजरेट केलेले कडक बटर वितळवून घेण्यासाठी वेळ नाही? मग या सोप्या पद्धतीने बटरचा करा वापर... gobblegrams या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जाणून घेऊयात नक्की काय आहे उपाय....
कृती :-
१. बटर फ्रिजमधून बाहेर काढून ठेवावे.
२. चहा गाळायच्या गाळणीच्या जाळीदार पृष्ठ भागाने हे बटर खरवडून घ्यावे.
३. अश्या प्रकारे खरवडून घेतल्यास त्या बटरचे बारीक किस गाळणीत जमा होतील.
४. गाळणीत जमा झालेले बटर चमच्याच्या मदतीने काढून घेऊन आपण आपल्याला हव्या त्या पदार्थामध्ये घालू शकतो.