झटपट काही तरी तयार करायचे असले की आपल्याकडे मग पोहे करू का? असा प्रश्न आपसूकच विचारला जातो. झटपट तयार होतात तसेच सगळ्यांच्या आवडीचे असतात.(What's the fun in summer if you don't eat 'Kolache Poha' from Konkan? See traditional recipe) पोह्यांपासून फक्त फोडणीचे पोहे नाही तर, इतरही अनेक पदार्थ तयार केले जातात. भारताच्या पाककलेचे वैशिष्ट्य म्हणजे अनेकविध पदार्थ तयार केले जातात. प्रत्येक राज्यातच नाही तर प्रत्येक गावामधून वेगळा पदार्थ तयार केला जातो. ज्या ठिकाणी जो पदार्थ जास्त प्रमाणात उपलब्ध असतो, तेथे त्याचा वापर करून रेसिपी तयार केली जाते. असाच एक पदार्थ म्हणजे कोळाचे पोहे. कोकणामध्ये नारळाचे दूध सहज उपलब्ध होते त्यामुळे नाराळाचा हा खास पदार्थ तेथे तयार केला जातो.
साहित्य(What's the fun in summer if you don't eat 'Kolache Poha' from Konkan? See traditional recipe)चिंच, गूळ, जाड पोहे, नारळाचे दूध, पाणी, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, तेल, मोहरी, जिरं, हींग,
कृती १. एक तासभर गूळ आणि चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवा. जरा नीट भिजले गेले की मग ते हाताने कुसकरा आणि मग त्यामध्ये थोडे आणखी पाणी घाला. अति पातळ करू नका. चिंचेचा चांगला रस काढून घ्या. नंतर गाळणीच्या मदतीने चोथा वेगळा करून घ्या.
२. नारळ फोडून घ्या. त्याचे तुकडे करा. ते तुकडे आणि पाणी मिक्सरमध्ये घ्या. व्यवस्थित फिरवून घ्या. एका स्वच्छ फडक्याच्या मदतीने सगळं छान गाळून घ्या. नारळाचे दूध तयार आहे. चोथा बाजूला करा.
३. एका भांड्यामध्ये जाड पोहे घ्या. त्यांना थोडं पाणी आणि थोडं नारळाचे दूध लावा. ते भिजत ठेवा.
४. एका भांड्यामध्ये चिंचेचा तयार केलेला कोळ आणि नारळाचे दूध एकजीव करून घ्या. दुधाच्या प्रमाणाच्या निमपट चिंचेचा कोळ घ्यायचा. त्यामध्ये मीठ घाला कोथिंबीर बारीक चिरून घाला.
५. तेल गरम करा. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कडीपत्ता घालून छान फोडणी तयार करा. तयार फोडणी कोळावर ओता.
६. पोहे व कोळ मिक्स करू नका. ते वेगळे ठेवा. खाताना भिजवलेले पोहे व कोळ एकत्र करायचा आणि खायचे.