Lokmat Sakhi >Food > प्रेशर कुकरमध्ये अगदी १० मिनिटांत करा ढोकळा; शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक आणि झटपट पदार्थ

प्रेशर कुकरमध्ये अगदी १० मिनिटांत करा ढोकळा; शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक आणि झटपट पदार्थ

What's the recipe for a perfectly risen, fluffy Khaman Dhokla? : मिक्सरच्या भांड्यात करा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2024 04:09 PM2024-08-22T16:09:29+5:302024-08-22T18:29:12+5:30

What's the recipe for a perfectly risen, fluffy Khaman Dhokla? : मिक्सरच्या भांड्यात करा जाळीदार स्पॉन्जी ढोकळा

What's the recipe for a perfectly risen, fluffy Khaman Dhokla? | प्रेशर कुकरमध्ये अगदी १० मिनिटांत करा ढोकळा; शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक आणि झटपट पदार्थ

प्रेशर कुकरमध्ये अगदी १० मिनिटांत करा ढोकळा; शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक आणि झटपट पदार्थ

गुजराथचे अनेक पदार्थ जगभरात फेमस आहे. त्यातील एक पदार्थ म्हणजे ढोकळा (Khaman Dhokla). खमण ढोकळा कोणाला नाही आवडत. सकाळचा नाश्ता किंवा सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपण खमण ढोकळा खातो (Cooking Tips). ढोकळा अनेक प्रकारचे केले जातात. त २ प्रकार खूप फेमस आहेत.

एक रव्याचा तर दुसरा डाळीचा ढोकळा लोक आवर्जुन खातात. रव्याचा ढोकळा झटपट तयार होतो. तर डाळीचा पिवळा ढोकळा तयार करण्यासाठी बराच वेळ जातो. पण आपण बेसानाचाही ढोकळा ट्राय करून पाहू शकता. बेसनाचा ढोकळा करण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही. अगदी मिक्सरमध्येही आपण ढोकळा तयार करू शकता(What's the recipe for a perfectly risen, fluffy Khaman Dhokla?).

मिक्सरमध्ये करा बेसनाचा ढोकळा

लागणारं साहित्य


बेसन 

पाणी 

मीठ 

साखर 

हळद 

हिंग 

इनो 

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

मोहरी 

जिरं 

कडीपत्ता 

तेल 

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात दीड कप बेसन घ्या. त्यात एक कप पाणी, चवीनुसार मीठ, २ टेबलस्पून साखर, अर्धा चमचा हळद, २ बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिमुटभर हिंग, २ चमचे लिंबू पाणी आणि पाणी घालून साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घ्या. 

गुळगुळीत बॅटर तयार झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात दोन चमचे तेल घालून मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा इनो घालून चमच्याने एका बाजूने फेटून घ्या. फ्लफी बॅटर रेडी झाल्यानंतर एका भांड्याला ब्रशने तेल लावा, आणि त्यात बॅटर  ओता. 

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

प्रेशर कुकरच्या भांड्यात स्टॅण्ड ठेवा. स्टॅण्डवर भांडं ठेवा आणि प्रेशर कुकरचं झाकण लावा. २० मिनिटांसाठी वाफेवर ढोकळा शिजवून घ्या. ढोकळा वाफेवर शिजल्यानंतर भांडं काढा, व त्यातून ढोकळा बाहेर काढा, व कट करून घ्या. 

फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. त्यात अर्धा चमचा मोहरी, जिरं, साखर, मीठ, कडीपत्ता आणि पाणी घाला. २ मिनिटानंतर फोडणी ढोकळ्यावर ओतून पसरवा. 

Web Title: What's the recipe for a perfectly risen, fluffy Khaman Dhokla?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.