Lokmat Sakhi >Food > गव्हाच्या पिठाचे जाळीदार आप्पे! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुपरहेल्दी पदार्थ- सकाळच्या घाईसाठी झटपट रेसिपी

गव्हाच्या पिठाचे जाळीदार आप्पे! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुपरहेल्दी पदार्थ- सकाळच्या घाईसाठी झटपट रेसिपी

Wheat Aata Appe Recipe: कोणतंही धान्य भिजत न टाकता, मिक्सरमधून न वाटता झटपट सुपरहेल्दी आप्पे कसे करायचे ते पाहा...(how to make instant appe without using rice and dal)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2024 12:17 PM2024-06-15T12:17:32+5:302024-06-15T16:20:13+5:30

Wheat Aata Appe Recipe: कोणतंही धान्य भिजत न टाकता, मिक्सरमधून न वाटता झटपट सुपरहेल्दी आप्पे कसे करायचे ते पाहा...(how to make instant appe without using rice and dal)

wheat aata appe, rawa appe recipe, how to make instant appe without using rice and dal, simple recipe of instant appe, best dish for breakfast and kids tiffin | गव्हाच्या पिठाचे जाळीदार आप्पे! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुपरहेल्दी पदार्थ- सकाळच्या घाईसाठी झटपट रेसिपी

गव्हाच्या पिठाचे जाळीदार आप्पे! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी सुपरहेल्दी पदार्थ- सकाळच्या घाईसाठी झटपट रेसिपी

Highlightsही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला ना कोणतं धान्य पाण्यात भिजत घालायचंय, ना ते वाटत बसायचंय.. सकाळच्या घाईगडबडीत करण्यासाठी हा पदार्थ अगदी उत्तम आहे.

इडली, डोसे, आप्पे हे बहुसंख्य लोकांचे आवडीचे पदार्थ. हे पदार्थ असले की नाश्ता कसा मस्त होतो. हे पदार्थ डब्यात दिले तर मुलंही एकदम खूश. पण हे पदार्थ करण्यासाठी डाळ- तांदूळ भिजत घाला, नंतर वाटून घ्या, पुन्हा आंबवून घ्या.. असं सगळं करत बसण्यासाठी अनेकींकडे वेळ नसतो. म्हणूनच आता हे इंस्टंट आप्पे कसे करायचे ते पाहून घ्या (wheat aata appe). ही रेसिपी करण्यासाठी तुम्हाला ना कोणतं धान्य पाण्यात भिजत घालायचंय, ना ते वाटत बसायचंय.. सकाळच्या घाईगडबडीत करण्यासाठी हा पदार्थ अगदी उत्तम आहे (best dish for breakfast and kids tiffin). बघा त्याची ही खास रेसिपी. (simple recipe of instant appe)

गव्हाच्या पिठाचे आप्पे करण्याची रेसिपी

 

गव्हाच्या पिठापासून जाळीदार आप्पे कसे तयार करायचे याची रेसिपी Cooking ticket marathi या यु ट्यूब पेजवर शेअर करण्यात आली आहे.

साहित्य

१ वाटी गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक

Fathers Day Special: वडिलांसाठी काहीतरी खास करायचंय? बघा ६ पर्याय, दिवस होईल यादगार...

अर्धी वाटी रवा

दिड वाटी पाणी

१ मध्यम आकाराचा कांदा

गाजर, पत्ताकोबी, सिमला मिरची अशा तुमच्या आवडीच्या चिरलेल्या भाज्या सगळ्या मिळून १ कप

१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

चवीनुसार हिरवी मिरची आणि मीठ

१ टीस्पून धने- जीरे पूड

 

कृती 

सगळ्यात आधी तर एका भांड्यात गव्हाचं पीठ, रवा एकत्र करून घ्या. 

मुलं खूपच चंचल आहेत- एकाजागी शांत बसतच नाहीत? तज्ज्ञ सांगतात ३ उपाय- एकाग्रताही वाढेल

यानंतर त्यामध्ये पाणी टाकून पीठ भिजवून घ्या. गव्हाचं पीठ आणि रवा मिळून दिड कप असल्यास ते मिश्रण भिजविण्यासाठी दिड कप पाणी पुरेसं होतं. पण गरज पडल्यास आणखी पाणी टाकू शकता. पण हे पीठ खूप पातळ होणार नाही, याकडे मात्र लक्ष द्या.

 

पीठ भिजवून झाल्यावर त्यात मीठ, कोथिंबीर, धने- जिरेपूड आणि इतर चिरलेल्या भाज्या टाका. पुन्हा एकदा सगळं मिश्रण भिजवून घ्या आणि ते ५ ते १० मिनिटे झाकून ठेवा.

केमिकल्स असणारं विकतचं मेयोनिज खाण्यापेक्षा १० मिनिटांत घरीच तयार करा भरपूर प्रोटीन्स देणारं मेयोनिज

त्यानंतर नेहमीप्रमाणे करता तसे आप्पे पात्रात टाकून आप्पे करा. गव्हाचं पीठाचे आप्पे छान वाफवून घ्यायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे मध्यम आचेवर हे आप्पे करून घ्यावे.

या रेसिपीमध्ये तुम्ही थोडं दही, ताक टाकू शकता किंवा लिंबूही पिळू शकता.

 

Web Title: wheat aata appe, rawa appe recipe, how to make instant appe without using rice and dal, simple recipe of instant appe, best dish for breakfast and kids tiffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.