चकली (Chakali) हा असा पदार्थ आहे ज्याच नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. कुरकुरीत, खमंग चकली कोणत्याही वेळेला खायला चांगली वाटते. (How To Make Wheat Flour Chakali) चकली करण्याची सोपी रेसिपी पाहूया. ही चकली करण्यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाहीत. (How To Make Wheat Flour Chakali)
भाजणीची चकली करण्यासाठी बऱ्याच प्रोसेस कराव्या लागतात तांदूळ धुवून ते सुकवावे लागतात नंतर भाजणी तयार करावी लागते पण गव्हाची चकली खूपच सोपी आहे. गव्हाची चकली करण्याची एकदम सोपी रेसिपी पाहूया. संध्याकाळच्यावेळी नाश्त्याला खायला, दिवसभरात कधीही भूक लागल्यास किंवा पाहूणे आल्यानंतर डिशमध्ये ठेवण्यासाठी ही चकली उत्तम पर्याय आहे. (Atta Chakali Recipe)
गव्हाची चकली करण्यासाठी लागणारं साहित्य
२ कप गव्हाचे पीठ
दीड चमचा हिंग
१ छोटा चमचा जीरं
अर्धा चमचा हळद पावडर
अर्धा चमचा मिरची पावडर
१ चमचा पांढरे तीळ
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
गव्हाची चकली करण्यासाची कृती
१) गव्हाचे पीठ एका सुती कापडता बांधून स्टिमरमध्ये १५ मिनिटांसाठी शिजू द्या. स्टीमरचं कापड बाजूला काढा त्यानंतर गाठी चमच्याच्या मागच्या भागाच्या साहाय्याने तोडून घ्या. एक मोठं ताट घ्या त्यात गाळलेलं पीठ आणि सर्व मसाले घालून मिसळा, हळूहळू पाणी घालून मध्यम ते घट्ट पीठ मळून घ्या.
हरितालिकेच्या उपवासाचे ५ नियम; हरितालिकेला काय करावे, काय करू नये पाहा- उपवास फळेल
२) १५ मिनिटांसाठी पीठ असंच सोडून द्या. त्यानंतर पीठ पुन्हा मळून व्यवस्थित एकजीव करून करून घ्या. काहीवेळासाठी पीठ सुती कापडानं झाकून ठेवून द्या. चकली बनवण्याचा साचा घ्या. साच्याला थोडं तेल लावून त्यात मावेल इतका गोळा घाला. नंतर झाकण लावून चकल्या पाडून घ्या.
केस गळून गळून शेपटीसारखे झालेत? 'हे' घरगुती आयुर्वेदीत तेल लावा, १ महिन्यात केस लांब होतील
३) एका कढईत तेल गरम करून सपाट चमच्याच्या साहाय्याने चकली तेलात घाला. चकली छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये मध्यम ते उच्च आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत चकल्या. एका एअरटाईट डब्यात १५ दिवसांसाठी तुम्ही या चकल्या साठवून ठेवू शकता.