नानखटाई (nankhatai) म्हटलं की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. लांबून सुगंध आल्यानेच कळतं की घरात नानकटाई बनवली जात आहे. दिवाळीच्या दिवसांत लाडू, चिवडा, करंजीबरोबरच अनेक घरांमध्ये नानखटाई बनवली जाते. (Diwali Faral Recipe) नानखटाई तोंडात टाकताच विरघळते. अनेकांना चहासोबत नानखटाई खायला खूप आवडतं. (Diwali Special Nankatai Recipe)
नानखटाई बनवण्याची सोपी पद्धत माहिती करून घेऊ. अनेकदा नानखटाई कडक होते तर कधी दातांना चावायला खूप कष्ट पडतात. अनेकजण नानखटाईमध्ये मैदा, तूप या गोष्टींचा वापर केला जातो म्हणून लोकनानखटाई खात नाहीत. घरच्याघरी तुम्ही पौष्टीक नानखटाई बनवू शकता ते ही अगदी सोप्या पद्धतीनं.नानखटाई करण्यासाठी तुम्ही गव्हाच्या पीठासुद्धा वापर करू शकता. (How To Make Nankatai)
गव्हाच्या पिठाची नानखटाई करण्यासाठी लागणारं साहित्य
१) तूप- १ कप
२) साखर- १ कप
३) वेलची पावडर- १ छोटा चमचा
४) रवा- २ मोठे चमचे
५) बेसन- १ चमचा
६) बेकिंग पावडर - १ ते २ चमचे
७) गव्हाचं पीठ- अर्धा कप
८) बदाम आणि पिस्ते- १ वाटी
नानखटाई करण्याची सोपी रेसिपी (Nankatai Easy Recipe)
गव्हाच्या पिठाची नानखटाई बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत तूप घ्या त्यात साखर घालून व्यवस्थित मिसळा. यासाठी तुम्ही पावडर शुगरचा वापर करू शकता. नंतर गव्हाचं पीठ आणि सर्व पदार्थ यात घालून मिक्स करून घ्या. पीठ व्यवस्थित एकजीव करा.
नंतर एका ट्रे ला बटर पेपरनं कव्हर करा आणि गोलगोल पेढे बनवून ट्रे वर ठेवा. यावर पिस्ता आणि बदाम घालून नानखटाई फ्लॅट करा. नंतर नानखटाई बेक करण्यासाठी १८० डिग्री सेल्सियसवर ठेवा १२ ते १५ मिनिटं व्यवस्थित सोनेरी होऊ द्या. याशिवाय नानखटाई बनवण्यासाठी तुम्ही इडलीच्या भांड्याचाही वापर करू शकता. इडलीच्या भांड्यात परफेक्ट नानखटाई बनून तयार होईल.