Join us  

ना रवा - ना मैदा; भरपूर पुडाचे खुसखुशीत शंकरपाळे करायचेत? १ ट्रिक; पाहा झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2024 10:00 AM

Wheat Flour Shankarpali - Marathi Recipe : विकतसारखे परफेक्ट शंकरपाळे घरीच करा झटपट

दिवाळी (Diwali) म्हटलं की फराळ (Faral) आलंच. फराळामध्ये अनेक प्रकार आहेत. चकली, चिवडा, करंजी आणि लाडू केले जातात. यासह शंकरपाळेही केली जाते (Shankarpali). खुसखुशीत भरपूर पुड्यांची शंकरपाळे तोंडात टाकताच विरघळतात (Cooking Tips). पण शंकरपाळे करताना अनेकदा गणित बिघडतं. शंकरपाळे फार तेल शोषतात. शिवाय मऊ किंवा कडक होतात. ज्यामुळे शंकरपाळे खाण्याची इच्छा होत नाही.

शंकरपाळे करण्यासाठी आपण मैदा आणि साखरेचा हमखास वापर करतो. पण अनेकांना मैदा किंवा रवा आवडत नाही. जर आपल्याला मैदा आणि रव्याचा वापर न करता, गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत शंकरपाळे करून पाहा. अगदी काही मिनिटात शंकरपाळे तयार होतील(Wheat Flour Shankarpali - Marathi Recipe).

खुसखुशीत शंकरपाळे करण्यासाठी लागणारं साहित्य

१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

दूध

साखर

तेल

तूप

गव्हाचं पीठ

कृती

खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळे करण्यासाठी सर्वात आधी एका बाउलमध्ये अर्धा कप दूध घ्या. त्यात नंतर त्यात अर्धा कप साखर घाला, आणि चमच्याने मिक्स करा. साखर विरघळल्यानंतर त्यात अर्धा कप तूप घालून मिक्स करा. साखर दुधात पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅस बंद करा.

एका परातीत गव्हाचं पीठ घ्या. त्यात उकळलेलं दूध घालून चमच्याने मिक्स करा. आणि मग हाताने कणिक माळून घ्या. कणिक मळून झाल्यानंतर आपण मुरवत ठेवतो. पण तसे न करता, लगेच गोळा बनवून लाटून घ्या, आणि कापून शंकरपाळे तयार करा.

दुसरीकडे कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात शंकरपाळे घालून खरपूस तळून घ्या. थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यात शंकरपाळे साठवून ठेवा. अशा प्रकारे खुसखुशीत गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळे खाण्यासाठी रेडी. 

 

टॅग्स :दिवाळी 2024अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स