Join us

तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2024 22:35 IST

Wheat Modak Recipe : Quick Modak recipe :How to Make Wheat Flour Modak: बाप्पांच्या प्रसादासाठी करा महिनाभर टिकणारे झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक...

'मोदक' नाव जरी उच्चारलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटत. घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे 'मोदक'. गणेशोत्सव सुरु झाला की आपण दहा दिवसांत अगदी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक खातो. गणपती बाप्पासाठी नैवेद्य करायचा म्हटलं की पहिल्यांदा नाव मोदकाचेच घेतले जाते. मोदक खायला जितके आवडतात तितकेच ते तयार करण्यासाठी खूप मोठा घाट घालावा लागतो. एवढी मेहेनत करुन मोदक मनासारखे झाले तर खूपच आनंद होतो. याउलट मोदक फसले किंवा बिघडले तर हिरमोड होतो आणि चिडचिड होते ती वेगळीच(Wheat Modak Recipe).

मोदक करायचे म्हटलं की गूळ किसा, सारण तयार करा, पाऱ्या लाटा, पीठ भिजवा असे असंख्य प्रकार साग्रसंगीत करावे लागतात. मोदक तर खाण्यासाठी तयार करायचे असतात पण त्याच्यासाठी एवढा मोठा घाट घालणे कुणालाही पसंत नसते. अशावेळी घरात उपलब्ध असणाऱ्या काही निवडक पदार्थांचा वापर करुन आपण झटपट मोदक तयार करु शकतो. अशावेळी आपण झटपट तयार होणारे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक पटकन करु शकतो. गव्हाच्या पिठाचे मोदक पटकन तयार होतात आणि किमान महिनाभर चांगले टिकून राहतात. त्यामुळे रोज बाप्पाच्या प्रसादाला काय करायचे असा प्रश्न पडत असेल तर आपण हे  गव्हाच्या पिठाचे पौष्टिक मोदक तयार करु शकतो. गव्हाच्या पिठाचे मोदक तयार करण्याची सोपी रेसिप पाहूयात. saritaskitchenofficial या इन्स्टाग्राम पेजवरुन ही गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करण्यात आली आहे(How to Make Wheat Flour Modak).

साहित्य :- 

१. तूप - १ कप २. गव्हाचे पीठ - १ कप ३. काजू - बदाम काप - १/२ कप ४. पिठीसाखर - १ कप ५. मिल्क पावडर - १/४ कप ६. वेलची पूड - १/२ टेबलस्पून 

गणेशोत्सव स्पेशल : तळणीच्या मोदकाचं आवरण मऊ पडतं, चिवट होतं? फक्त ५ टिप्स-मोदक होतील खुसखुशीत...

गणेशोत्सव स्पेशल : बाप्पाच्या नैवेद्याला पंचखाद्य तर हवेच, १० मिनिटात करा हा पारंपरिक पदार्थ... 

कृती :- 

१. एका कढई मध्ये तूप घेऊन ते चांगले गरम करुन घ्यावे. तूप गरम झाल्यावर त्यात गव्हाचे पीठ घालून ते तुपात व्यवस्थित भाजून घ्यावे ३ ते ४ मिनिटे भाजल्यानंतर त्यात पुन्हा थोडे तूप घालून पीठ भाजून घ्यावे. पीठ थोडे रवाळ, मऊ एकजीव झाल्यासारखे दिसले की गॅस बंद करावा. गॅस बंद करून या पिठात मिल्क पावडर, पिठीसाखर घालून पीठ व्यवस्थित चमच्याने ढवळून घ्यावे. 

२. पिठात मिल्क पावडर, पिठीसाखर घातल्यानंतर त्याच्या गुठळ्या होऊ न देता हे दोन्ही जिन्नस पिठात मिस्क करून घ्यावेत. त्यानंतर पीठ चमच्याच्या मदतीने दाबून कढईच्या तळाशी त्याचा एक सपाट थर तयार करावा. त्यानंतर या कढईवर ५ मिनिटांसाठी झाकण ठेवून झाकून घ्यावे. जेणेकरून आतील वाफेने पिठीसाखर पूर्णपणे मिसळून पिठात चांगली मिक्स होईल. 

गणेशोत्सव स्पेशल : घरीच झटपट करा रसमलाई मोदक, कपभर पनीर आणि फक्त १० मिनिटांत मोदक तयार...

३. आता झाकण उघडून या पिठात आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्सचे काप, वेलची पूड तसेच गरज लागली तर तूप घालून घ्यावे. सगळे जिन्नस एकत्रित करुन घ्यावे. त्यानंतर मोदकाच्या साच्याला थोडेसे तूप लावून त्यात हे तयार मिश्रण घालून मोदक तयार करून घ्यावे.  

फक्त एक कप गव्हाच्या पिठात झटपट तयार होणारे आणि दीर्घकाळ टिकणारे पौष्टिक मोदक खाण्यासाठी तयार आहेत.   

टॅग्स :अन्नपाककृतीगणेशोत्सवगणेश चतुर्थी रेसिपी