श्रावण सुरू झाला की आपल्याकडच्या सणावारांना सुरुवात होते. आता प्रत्येक सणालाच आपण काही पुरण करत नाही. पण तरीही श्रावणातले शुक्रवार, मंगळागौरीची पुजा, त्यानंतर मग पोळा, गौरी- गणपती अशा सणांना प्रसंगानुसार पुरण शिजवलेच जाते. पुरण शिजवताना कुकरची शिट्टी होताच झाकणातून बरेच पाणी बाहेर येते आणि मग झाकण, कुकर, गॅस असं सगळंच खराब होऊन जातं. शिवाय कुकरमधलं पुरणातल्या पाण्याचं प्रमाण बिघडतं, ते एक वेगळंच. म्हणूनच तुमच्याही बाबतीत असंच होत असेल, तर या २ टिप्स नेहमी लक्षात ठेवा. (kitchen hacks tips to fix the pressure cooker leaking water issue)
पुरण शिजवताना कुकरमधून पाणी बाहेर येत असेल तर २ उपाय करा१. गॅसची फ्लेम तपासापुरण शिजवताना लक्षात ठेवायचा हा सगळ्यात पहिला नियम आहे. पुरणासाठी डाळ शिजवताना तुम्ही तुमच्या नेहमीच्या अंदाजाप्रमाणे पाणी टाका.
मुलांना सर्दी- खोकला झाला? उघडा आजीबाईंचा बटवा- ३ पदार्थ करतील औषधांचं काम - त्रास होईल कमी
पण जेव्हा कुकर गॅसवर ठेवाल तेव्हा गॅसची फ्लेम मध्यम असावी. खूप मोठा गॅस कराल तर शिट्टी होताना नक्कीच त्यातून पाणी बाहेर येईल. त्यामुळे पुरण नेहमी मध्यम आचेवरच शिजवावे.
२. चमच्याचा वापरआपण पुरण थेट कुकरमध्ये लावतो. त्यामुळे डाळीमध्ये पाणी टाकलं की त्यात एक चमचा म्हणजे आपला नेहमीचा पोहे खाण्याचा चमचा टाकून ठेवा.
आणि नेहमीप्रमाणे झाकण लावून टाका. चमचा टाकल्यामुळेही कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही. शिवाय डाळही अगदी छान शिजेल.