भाजलेले शेंगदाणे जर चवीला खमंग लागले नाहीत तर मजा येत नाही. शेंगदाणे खमंग भाजण्यासाठी काही युक्त्यांचा वापर केला तर मायक्रोवेव्हमध्ये किंवा बाहेर कढईतही शेंगदाणे खरपूस भाजले जातात.
Image: Google
मायक्रोव्हेवमध्ये शेंगदाणे भाजताना..
1. मायक्रोव्हेवमध्ये शेंगदाणे भाजण्यासाठी मायक्रोवेव्हच्या सेफ बाउलमध्ये शेंगदाणे घ्यावे. साधारण 2 चमचे पाणी दाण्यांवर घालून दाणे वर खाली हलवून घ्यावेत. पाणी लावलेले शेंगदाणे मायक्रोवेव्हमध्ये हाय टेम्परेचवर 2 मिनिटं भाजावेत.. नंतर शेंगदाणे हलवून पुन्हा 2 मिनिटं भाजावेत. भाजलेले शेंगदाणे मायक्रोवेव्हमधून काढून टिन फाॅइलवर पसरवून ठेवावेत. शेंगदाणे पसरवून ठेवणं आवश्यक असतं . शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर पसरवून ठेवले तरच खमंग होतात.
2. मसाला शेंगदाणे करण्यासाठी शेंगदाणे गरम असतानाच त्यावर आपल्या आवडीचे मसाले भुरभुरुन घ्यावेत आणि मग शेंगदाणे वर खाली करत चांगले हलवावेत.
Image: Google
कढईत शेंगदाणे खमंग भाजण्यासाठी
3. कढईत शेंगदाणे भाजताना आधी कढई चांगली गरम करुन घ्यावी. कढई चांगली गरम झाली की गॅसची आच मंद करावी. त्यात थोडं तूप घालावं आणि लगेच शेंगदाणे घालावेत.
4. शेंगदाणे कढईत घातल्यावर गॅसची आच मध्यम करावी आणि शेंगदाणे 5 मिनिटं भाजावेत. शेंगदाणे भाजताना चुकूनही गॅसची आच मोठी करु नये. गॅस मोठा केल्यास शेंगदाणे करपता आणि जळकट लागतात.
Image: Google
5. शेंगदाणे भाजून झाले की ते थंडं होवू द्यावेत. शेंगदाणे गरम असताना ते जर बरणीत किंवा डब्यात भरले तर ते खमंग राहात नाही. शेंगदाणे खमंग राहाण्यासाठी ते पूर्ण थंडं झाल्यावर डब्यात भरावेत.
6. तूप किंवा तेल न घालता शेंगदाणे कोरडेच भाजायचे असल्यास कढई गरम झाल्यावर लगेच शेंगदाणे घालून मंद आचेवर भाजावेत. 5 मिनिटं शेंगदाणे सतत हलवत राहावेत. शेंगदाणे थंडं झाल्यावर मग शेंगदाण्याची फोलपटं काढावीत.