चवदार स्वयंपाक करणं ही एक कला आहे. कोणतीही कला शिकताना तिच्यातले बारकावे जसे समजून घ्यावे लागतात, तसंच स्वयंपाकाचं म्हणजेच पाककलेचं आहे. या काही लहान- सहान गोष्टी जर नीट समजून घेतल्या तर तुम्हीही अगदी चवदार स्वयंपाक करू शकाल. नव्याने स्वयंपाक करणारे जे आहेत, त्यांना बऱ्याचदा कोणता मसाला कुठल्या पदार्थामध्ये घालावा, याबाबत गाेंधळ होतो. म्हणूनच या काही टिप्स लक्षात ठेवा आणि चवदार स्वयंपाक करा (special tips for tasty food).. सुरुवातीला कनफ्यूजन टाळण्यासाठी खाली दिलेल्या ४ मसाल्यांचा वापर केला तरी खूप चविष्ट भाज्या होऊ शकतील. (how to make sabji more tasty)
कोणता मसाला कुठल्या पदार्थात घालावा?
१. काळा मसाला आणि गोडा मसाला असे मसाल्यांचे दोन प्रकार आहेत. गोडा मसाला तिखट नसतो. त्यामुळे हा मसाला ज्या अगदी साध्या चवीच्या भाज्या असतात त्यामध्ये घाला. खिचडी, आंबट वरण यांच्यातही हा मसाला चवदार लागतो.
हनुवटीखाली चरबी वाढल्याने चेहरा गुबगुबीत दिसतो? ३ सोपे व्यायाम, जॉ-लाईन होईल परफेक्ट
२. ज्या रस्सा भाज्या तुम्हाला थोड्या मसालेदार पाहिजे असतात, त्यांच्यामध्ये काळा मसाला घालावा.
३. मसाल्याच्या डब्यातलं जे लाल तिखट आहे ते बहुतांश पदार्थांमध्ये वापरलं जातं. अगदी चटणीपासून ते पंचामृतापर्यंत अनेक पदार्थांमध्ये हे तिखट घाला.
४. कांदा- लसूण मसाला भाज्यांना झणझणीत चव देतो. लाल ग्रेव्हीच्या झणझणीत मसालेदार भाज्यांमध्ये कांदा- लसूण मसाला घालावा.
अंडरआर्म्सच्या काळेपणामुळे स्लिव्हलेस घालायला नको वाटतं? १ खास उपाय, काखेतला काळेपणा कायमचा जाईल
शिवाय लसूण फोडणीला घालून आपण जे कोणते पदार्थ करतो, त्या बहुतांश पदार्थांमध्ये कांदा- लसूण मसाला चवदार लागतो. कोल्हापुरी स्टाईल मिसळ किंवा लाल रस्सा असणारी शेव भाजी यामध्येही तुम्ही हा मसाला वापरू शकता.
५. आलं- लसूण- मिरची पेस्टचाही मसालेदार पदार्थ करण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो.
१५ दिवसांत चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो! फक्त २ मिनिटांचा सोपा उपाय, त्वचा होईल चमकदार
हे वाटण नेहमी तुमच्याकडे तयार असू द्या. वेगवेगळ्या भाज्या, वरण किंवा पुलाव, पावभाजी, मसालेभात, बटाटेवडे, पराठे अशा बऱ्याचशा पदार्थांमध्ये हे मसालेदार वाटण घालू शकता.