Lokmat Sakhi >Food > वरणाला फोडणी देताना तेलाचा वापर करावा की तुपाचा? हाडं मजबूत ते वेट लॉस; पाहा कशाने फायदा होईल?

वरणाला फोडणी देताना तेलाचा वापर करावा की तुपाचा? हाडं मजबूत ते वेट लॉस; पाहा कशाने फायदा होईल?

When to use ghee and oil? while making dal tadka- health benefits : भातावर वरण त्यावर तुपाची धार, आहाहा..म्हणजे पोट आणि आरोग्य दोन्ही तृप्त..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2024 11:49 AM2024-06-12T11:49:36+5:302024-06-12T11:50:27+5:30

When to use ghee and oil? while making dal tadka- health benefits : भातावर वरण त्यावर तुपाची धार, आहाहा..म्हणजे पोट आणि आरोग्य दोन्ही तृप्त..

When to use ghee and oil? while making dal tadka- health benefits | वरणाला फोडणी देताना तेलाचा वापर करावा की तुपाचा? हाडं मजबूत ते वेट लॉस; पाहा कशाने फायदा होईल?

वरणाला फोडणी देताना तेलाचा वापर करावा की तुपाचा? हाडं मजबूत ते वेट लॉस; पाहा कशाने फायदा होईल?

वरण - भात खायला कोणाला नाही आवडत (Dal Tadka). वरण भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. भातावर वरण त्यावर तुपाची धार, आहाहा..म्हणजे पोट आणि मन दोन्ही तृप्त होते (Health Benefits). वरण भात खाण्याचे अनेक फायदे आहेत. यातून शरीराला अनेक पौष्टीक घटक मिळतात. काही घरांमध्ये वरणावर तुपाची फोडणी देतात.

पण वरणाला तुपाची फोडणी किंवा डाळीमध्ये तूप घालून खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात? याबद्दलची माहिती आहारतज्ज्ञ मोनिका यांनी दिली आहे. वरणामध्ये तूप घालून खाण्याचे फायदे किती? पाहूयात(When to use ghee and oil? while making dal; Health Benefits).

वरणामध्ये तूप घालून खाण्याचे फायदे किती?

वरण आणि तुपामध्ये अनेक जीवनसत्त्वे, फायबर, कॅल्शियम, लोह इत्यादी पोषक तत्वे आढळतात. जे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.

पचनसंस्था निरोगी राहते

वरणासोबत तूप घालून खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या लोकांना डाळी पचत नाही. किंवा अपचनाचा त्रास होतो, त्यांनी वरणामध्ये तूप घालून खावे. रोज एक चमचा तूप वरणामध्ये मिक्स करून खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत राहील. यासोबतच अपचन, गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्यांपासून आराम मिळेल.

अदिती सारंगधरला लागले होते बिअर पिण्याचे डोहाळे; पण गरोदरपणात बिअर प्यावी? स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात..

हाडांना मिळेल बळकटी

वरणामध्ये तूप मिसळून खाल्ल्याने हाडांना खूप फायदे मिळतात. कारण तुपात आढळणारे कॅल्शियम आणि पोषक तत्व हाडांसाठी फायदेशीर असतात. हाडांना बळकटी मिळते.

हृदय निरोगी राहते

डाळ आणि तूप हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुपामध्ये सॅच्युरेटेड फॅट, व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असते. जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी, पोट, त्वचा, केस इत्यादीसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात तुपाचा समावेश करायला हवा.

वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल? '५' चुकांमुळे वजन कमी होत नाही; आजच बदला पटकन

प्रतिकारशक्ती वाढते

वरणामध्ये तूप घालून खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे रोगांशी लढण्याची क्षमता मजबूत होते. खरंतर तुपात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळतात जे शरीराला विषाणूजन्य आजारांशी लढण्यास मदत करतात.

Web Title: When to use ghee and oil? while making dal tadka- health benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.