वाढतं वजन (weight loss), वाढतं काेलेस्ट्रॉल (cholesterol) या आरोग्याच्या समस्या सध्या अनेक लोकांना छळत आहेत. या दोन्ही गोष्टी नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक जण व्यायाम करतात तर कोणी कोणी कडक डाएट करतात. आहारातलं तेलाचं वाढलेलं प्रमाण हे या दोन्ही गोष्टी वाढण्यासाठी कारणीभूत आहेत असं तज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. त्यामुळेच कमीतकमी तेल खाण्याकडे अनेकांचा कल असतो. पण तरीही कधी कधी काहीतरी तळलेलं खमंग खाण्याची इच्छा होतेच. प्रत्येकवेळी ही इच्छा दाबून टाकता येतेच, असं नाही. अशावेळी मनासारखे तळलेले पदार्थ खाताही येतील आणि शिवाय वजन आणि कोलेस्ट्रॉलही वाढणार नाही (4 best cooking oils for health) यासाठी काय करावं याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती एकदा बघाच...(which cooking oil is best for deep frying?)
पदार्थ तळण्यासाठी कोणतं तेल वापरणं अधिक चांगलं
नवभारत टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार डॉ. गीता श्रॉफ असं सांगतात की तूप, रिफाईंड कैनोला ऑईल, रिफाईंड खोबरेल तेल आणि शेंगदाणा तेल जर तुम्ही वेगवेगळे पदार्थ तळण्यासाठी वापरले तर ते तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाही.
Valentine's Day: प्रेमाच्या दिवशी गुलाबाला एवढं महत्त्व का असतं बरं? वाचा गुलाबाचे रंजक फायदे
या चारपैकी सगळ्यात उत्तम काय आहे याविषयी डॉक्टर सांगतात की कोणताही पदार्थ जर डीप फ्राय करायचा असेल तर त्यासाठी शेंगदाणा तेल वापरणं अधिक चांगलं. शेंगदाणा तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात. त्यामुळे समोसे, चिप्स, भजी या पदार्थांसाठी तसेच चायनिज पदार्थ करण्यासाठी शेंगदाणा तेल वापरावे.
रिफाईंड कोकोनट ऑईलमध्ये हेल्दी फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असतात. तसेच त्यामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्सही असतात जे शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी उपयुक्त ठरतात.
तुमच्या घरात जेड प्लांट असायलाच हवं, कारण....; वाचा जेड प्लांट घरात असण्याचे ६ फायदे
पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठीही रिफाईंड कोकोनट ऑईल उत्तम असते. त्यामुळे या तेलात तळलेले पदार्थ पचायला सोपे जातात. बेक करण्याचे जे पदार्थ असतात त्यांच्यामध्येही रिफाईंड कोकोनट ऑईल वापरावे.
रिफाईंड कॅनोला ऑईल म्हणजेच मोहरीच्या तेलामध्ये हृदयासाठी चांगले असणारे ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी ॲसिड जास्त प्रमाणात असतात.
चमचाभर कॉफी घेऊन 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा! टॅनिंग, ब्लॅकहेड्स जाऊन त्वचेवर येईल ग्लो
तसेच त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅटसुद्धा कमी प्रमाणात असतात. शिवाय या तेलाचा स्मोकिंग पॉईंट खूप जास्त असल्याने ते तळण्यासाठी अधिक चांगले मानले जाते.