Lokmat Sakhi >Food > बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल

बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल

Which Oil To Use For Cooking?: बहुतांश घरांमध्ये अगदी पोळ्यांपासून ते चटण्यांपर्यंत सगळेच पदार्थ करण्यासाठी सरसकट एकच तेल वापरतात. तुम्हीही तसंच करत असाल तर हे एकदा वाचा... (Which cooking oil is best?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 04:53 PM2024-01-15T16:53:25+5:302024-01-15T16:54:18+5:30

Which Oil To Use For Cooking?: बहुतांश घरांमध्ये अगदी पोळ्यांपासून ते चटण्यांपर्यंत सगळेच पदार्थ करण्यासाठी सरसकट एकच तेल वापरतात. तुम्हीही तसंच करत असाल तर हे एकदा वाचा... (Which cooking oil is best?)

Which cooking oil is best? which cooking oil is very dangerous for health?  which oil to use for cooking? | बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल

बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल

Highlights३ महिने जर हा प्रयोग करून पाहिला, तर नक्कीच तुमच्या आरोग्याच्या ५० टक्के तक्रारी कमी होतील, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. 

महिनोंमहिने एकच एक प्रकारचं तेल आपण खात असू तर ते आपल्या आरोग्यासाठी आणि खासकरून हृदयासाठी हानिकारक  असते. त्यामुळे दर महिन्याला तेलामध्ये बदल करत राहावा, असं तज्ज्ञ डॉक्टर, आहारतज्ज्ञ नेहमीच सांगतात. किंवा असं दर महिन्याला वेगवेगळं तेल खाण्यापेक्षा जर पदार्थांनुसार तेल बदललं तर ते आरोग्यासाठी अधिक चांगलं असतं. कारण त्यामुळे ओमेगा ३ आणि ओमेबा ६ यांचा शरीरात खूप चांगला बॅलेन्स राखता येतो (which oil to use for cooking?). म्हणूनच कोणता पदार्थ करताना कोणतं तेल वापरावं आणि कोणतं तेल खाणं पुर्णपणे टाळावं (which cooking oil is very dangerous for health?), याविषयी बघा ही आहारतज्ज्ञांनी दिलेली माहिती. (Which cooking oil is best?)

 

कोणता पदार्थ करण्यासाठी कोणतं तेल वापरावं?

कोणता पदार्थ करण्यासाठी कोणतं तेल वापरावं, याविषयीचा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी dt.lavleen या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्या सांगतात की तुम्ही पोळी, पराठा खाणार असाल तर त्याला तेल लावणं टाळा.

हळदीकुंकू कार्यक्रमात सुंदर दिसायचंय? मेकअप करण्यापुर्वी 'हा' उपाय करा- चेहऱ्यावर येईल खूप तेज

पोळी, पराठे नेहमी तूप लावूनच खावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच तूप लावताना ते पोळी तव्यावर असताना लावण्यापेक्षा तव्यावरून खाली घेऊन मग लावावे. 

कोणतीही भाजी, वरण करण्यासाठी मोहरी, तीळ, शेंगदाणा यांचं कोल्ड प्रेस्ड ऑईल म्हणजेच घाण्यातून काढलेलं तेल वापरावं.

 

भाज्या शिजवण्यासाठी, वाफवण्यासाठी थोडंसं तेल टाकणार असाल तर त्यासाठी ऑलिव्ह ऑईल वापरा. परदेशात असाल तर ॲव्हाकॅडो ऑईल, grapeseed oil  वापरू शकता. पण हे दोन्ही तेल भारतीय पदार्थांना फोडणी घालण्यासाठी वापरू नयेत.

जगभरातील 'बेस्ट' पदार्थांच्या यादीत असणारे ५ भारतीय व्हेज पदार्थ- बघा तुम्हालाही ते आवडतात का?

कॅनोला ऑईल, सनफ्लॉवर ऑईल, सॅफ्लोवर ऑईल, व्हेजिटेबल ऑईल, पाम तेल हे तेलाचे प्रकार वापरणं पुर्णपणे टाळावं कारण ते आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. ३ महिने जर हा प्रयोग करून पाहिला, तर नक्कीच तुमच्या आरोग्याच्या ५० टक्के तक्रारी कमी होतील, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. 


 

Web Title: Which cooking oil is best? which cooking oil is very dangerous for health?  which oil to use for cooking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.