Lokmat Sakhi >Food > तुम्ही जे खाता ते पदार्थ आनंदी आहेत की दुःखी? 'हॅपी' आणि 'सॅड' फूड म्हणजे काय?

तुम्ही जे खाता ते पदार्थ आनंदी आहेत की दुःखी? 'हॅपी' आणि 'सॅड' फूड म्हणजे काय?

Food Mood: तुमचा जसा मूड असतो ना, तसाच मुड रंगांना आणि पदार्थांनाही असतो. तुम्हाला माहिती आहे का हॅप्पी आणि सॅड मुडचे (what is happy food?) पदार्थ म्हणजे नेमकं असतं तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 01:59 PM2022-03-29T13:59:09+5:302022-03-29T13:59:40+5:30

Food Mood: तुमचा जसा मूड असतो ना, तसाच मुड रंगांना आणि पदार्थांनाही असतो. तुम्हाला माहिती आहे का हॅप्पी आणि सॅड मुडचे (what is happy food?) पदार्थ म्हणजे नेमकं असतं तरी काय?

Which food do you eat? Weather it is 'Happy' or 'Sad'? How to identify it? | तुम्ही जे खाता ते पदार्थ आनंदी आहेत की दुःखी? 'हॅपी' आणि 'सॅड' फूड म्हणजे काय?

तुम्ही जे खाता ते पदार्थ आनंदी आहेत की दुःखी? 'हॅपी' आणि 'सॅड' फूड म्हणजे काय?

Highlightsमानसिक आरोग्यासंदर्भात असणाऱ्या पुस्तकांमध्ये किंवा अभ्यासक्रमातही हॅप्पी आणि सॅड फूड यांचा उल्लेख आढळतो. 

आपण काय करतो, काय बघतो, काय वाचतो, आपली मित्रमंडळी आणि साथसंगत नेमकी कशी आहे.. यावर अनेकदा आपला मुड बदलत जातो. आसपासच्या वातावरणातून आपले विचार तयार होत जातात. असंच काहीसं अन्न पदार्थांच्या बाबतीतही होतं. तुम्ही काय आणि किती खाता यावर तुमचा मुड तयार होतो, अन्नपदार्थांनुसार सकारात्मक किंवा नकारात्मक विचार आपल्या डोक्यात येत असतात. त्यामुळेच तर मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी काही अन्नपदार्थ आवर्जून घेतले पाहिजेत, तर काही टाळले पाहिजेत. मानसिक आरोग्यासंदर्भात असणाऱ्या पुस्तकांमध्ये किंवा अभ्यासक्रमातही हॅप्पी आणि सॅड फूड (which are sad food items?) यांचा उल्लेख आढळतो. 

 

थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे हॅप्पी फूड्स खाल्ल्यावर तुमचे पोट तर भरतेच पण मनही भरते. समाधान मिळते आणि भरपूर उर्जा मिळते. त्याउलट सॅड फूड तुमच्या शरीराच्या उर्जेत विशेष भर टाकत नाहीत. उलट असे पदार्थ खाल्ल्यामुळे सुस्ती, थकवा आणि आळस येतो. म्हणूनच तर तुमचं डाएट आणि तुमचा मुड यांचा खूप जवळचा संबंध असल्याचं विज्ञानात सांगितलं आहे.  उदाहरणार्थ-  जेव्हा आपण एखादं जंकफूड खातो तेव्हा आपल्या आवडीचा पदार्थ खाऊन आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. आपण काही काळासाठी खुश होतो. पण या पदार्थांमधून मिळणारी उर्जा अधिक काळ टिकणारी नसते. आपल्या शरीराला पौष्टिक पदार्थ देण्यासाठीही हे पदार्थ उपयुक्त ठरत नसतात. आणि काही काळाने ॲसिडिटी, पोट खराब होणे, सुस्ती येणे या माध्यमातून त्याचे परिणाम दिसतात.

 

हॅप्पी फूड अंतर्गत येणारे पदार्थ
- फळं आणि भाज्या, 
- तेल
- डार्क चॉकलेट
- ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ
- भरपूर प्रमाणात फायबर असणारे पदार्थ
- प्रोटीन रिच पदार्थ

 

सॅड फूड मध्ये येणारे पदार्थ
- खूप अधिक प्रमाणात प्राेसेस केलं जाणारे पदार्थ
- जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ
- पॅक फूड
- हेवी शुगर आणि हेवी फॅट फूड
- आर्टिफिशियल रंग वापरून केलेले पदार्थ

 

Web Title: Which food do you eat? Weather it is 'Happy' or 'Sad'? How to identify it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.