आपल्या स्वयंपाकघरात पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण हिंगाचा वापर करतो. (Best Time to Use Hing in Cooking)मसाल्याच्या डब्यातील सर्वात महत्त्वाचा मसाला. अन्नाच्या चवीसोबतच सुगंध देखील वाढवतो. तसेच पचनसाठी देखील फायदेशीर आहे. (When to Add Asafoetida to Dishes) लोणचे टिकवण्यापासून ते पोटासंबंधित असणाऱ्या अनेक समस्या कमी करण्यासाठी आपण हिंगाचा वापर करतो. (Hing Before or After Tempering)
अनेकदा फोडणी देताना हिंग तेलात टाकताच ते जळते किंवा करपते. त्यामुळे त्याची चव कडू लागते. (How to Use Hing for Flavor)आपल्यासोबतही असेच काहीसे होत असेल तर जेवण बनवताना हिंग कधी घालावे? हिंग घालण्याची योग्य पद्धत कोणती? हिंग फोडणी देण्यापूर्वी घालावे की नंतर... ही सोपी ट्रिक नेहमी लक्षात ठेवा. (Hing Flavor in Indian Recipes)
३ पदार्थ वापरुन घरीच तयार करा डाळिंबाची जेली; परफेक्ट बनेल, विकतचे जेली-जॅम विसराल
1. फोडणी दिल्यानंतर हिंग घालणे योग्य आहे का?
हिंगाची चव आणि त्याचे प्रमाण हे पदार्थाच्या प्रमाणानुसार ठरते. त्याचा वापर हा फोडणी देताना तूप किंवा तेलात घालण्याचा सल्ला दिला जातो. गरम तेलात हिंगाचे गुणधर्म आणि चव चांगली लागते. तसेच ते पूर्णपणे अन्नात विरघळते.
2. फोडणी देताना हिंगाचे फायदे
तूप किंवा तेलात हिंग घातल्यास त्याचा सुगंध आणि चव अधिक प्रमाणात येते. तसेच अन्नाची चवही वाढते. पचनक्रिया सुधारुन गॅसची समस्या दूर होते.
समर स्पेशल: कैरी आणि बोराची आंबटगोड चटणी! करायला अगदी सोपी, उन्हाळ्यात जेवणात हवीच हवी
3. फोडणी दिल्यानंतर हिंगाचे फायदे
हिंग फोडणी दिल्यानंतर पदार्थात घातल्यास त्याची चव तितकीशी चांगली लागत नाही. यामुळे अन्नाची चव कडू लागते. हिंगात असणारे घटक पदार्थामध्ये पूर्णपणे विरघळत नाही. हिंग हे डाळ, भाज्या किंवा अनेक पारंपरिक पदार्थ बनवताना वापरले जाते. डाळ, छोले, राजमा, कढी किंवा खिचडीला फोडणी देताना हिंग घातल्यास त्याची चव आणखी वाढते.
4. हिंगाची फोडणी कशी द्यायची ?
सर्वात आधी तूप किंवा तेल गरम करा . यात जिरे, मोहरी, कढीपत्ता किंवा इतर फोडणीचे मसाले घाला यानंतर हिंग घाला. कांदा, लसूण किंवा टोमॅटो घालून चांगले शिजवा. हिंग जास्त वेळ तेलात तळल्याने ते कडू लागते. आपल्याला पदार्थाची चव वाढवायची असेल तर गरम तेल किंवा तूपाची फोडणी देताना त्यात हिंग घाला. यामुळे पदार्थाची चव तर वाढेलच पण आरोग्यासाठीही ते अधिक फायदेशीर राहिल.