कुकिंग ऑईलशी आपल्या आरोग्याचा घनिष्ट संबंध असतो. (Cooking Oil) चांगल्या आरोग्यासाठी कुकींग ऑईल महत्वपूर्ण ठरते. (Which is The Best Cooking Oil) अमेरिकन हार्ट एसोसिएशनच्या रिपोर्टनुसार कुकींग ऑईलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॅट्स असतात. तेलात गुड आणि बॅड फॅट्स मोठ्या प्रमाणात असतात. कुकिंग ऑईलची निवड करताना काही गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. हेल्दी कुकींगबाबत माहिती असायला हवी. हेल्दी कुकींग ऑईलच्या मदतीने जेवण हेल्दी आणि चविष्ट होते. ( Best Oil For Cooking Which Don't Increase Heart Disease Risks)
१) मोहोरीचे तेल
उत्तर भारतात कुकिंग ऑईलमध्ये जास्तीत जास्त मोहोरीच्या तेलाचा वापर केला जातो. मोहोरीचे तेल हेल्थसाठी गरजेचे असते. त्यातील प्रॉपर्टीज शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढवतात. यात व्हिटामीन ई, व्हिटामीन के आणि इतर पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला बरेच फायदे मिळतात.
२) नारळाचे तेल
नारळाच्या तेलाच्या वापर साऊथमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. हे तब्येतीसाठी फायदेशीर ठरते. आठवड्यातून एक ते दोनवेळा कुकींगमध्ये याचा समावेश करा. जेणेकरून तेलातील आवश्यक पोषक तत्व तुम्हाला मिळतील. हेल्दी कुकींगसाठी एक्सपर्ट्सचा सल्ला नक्की घ्या.
३) पीनट ऑईल
एशियन फूड तयार करण्यासाठी पीनट ऑयल बेस्ट मानले जाते. हे तेल एका सुपरफूडप्रमाणे आहे. यात मोनोसॅच्युरेडेट आणि पॉलिसॅच्युरेडेट फॅट्स असतात. यात बॅड सॅच्युरेडेट फॅट्स कमी असतात. ज्यामुळे हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत होते.
गुडघे दुखतात-कॅल्शियम कमी झालयं? रोज चमचाभर या प्रकारच्या २ बीया खा, हाडं ठणठणीत होतील-फिट दिसाल
४) सुर्यफुलाचे तेल
सूर्यफुलाच्या बियांपासून बनवलेले हे तेलही आरोग्यदायी आहे. त्यात मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आढळतात आणि या तेलाचा स्मोकिंग पॉइंटही जास्त असतो. सूर्यफुलाची पोषकतत्त्वे जास्त असतानाही खराब होत नाहीत.
पोट कमी करायचंय, डाएट शक्य नाही? फक्त १० रूपयांत मूठभर शेंगदाणे खा-वजन घटवण्याची खास युक्ती
५) राईस ब्रान ऑईल
राईस ब्रॅनपासून बनवलेले हे राईस ब्रॅन ऑइल आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्याचा स्मोक पॉइंट 450 डिग्री फॅरेनहाइट आहे, त्यामुळे ते उच्च उष्णता स्वयंपाकात आरामात वापरले जाऊ शकते. तसेच खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते.