Join us  

दिवाळी : फराळाचे पदार्थ तळण्यासाठी कोणते तेल योग्य? तज्ज्ञ सांगतात, ‘हे’ तेल योग्य- वाढत नाही वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2024 1:14 PM

Which is the healthiest oil for deep-frying and pan-frying? for Diwali faral : फराळाच्या पदार्थांसाठी योग्य तेल निवडलं तर वजन वाढणार नाही

आता काही दिवसांवर दिवाळी (Diwali) हा सण येऊन ठेपला आहे. दिवाळीची सुरुवात आपण घराची साफसफाईपासून करतो. साफ सफाई झाल्यानंतर आपण फराळ करायला घेतो (Weight Loss). चकली, चिवडा, शंकरपाळी, लाडू, करंजी यासह विविध पदार्थ केले जातात (Cooking Oil). सर्व पदार्थांमध्ये सर्वात कॉमन वापरण्यात येणारी गोष्ट म्हणजे तेल. तेलाचा वापर करून प्रत्येक पदार्थ करतो. कोरोनानंतर प्रत्येक जण आपल्या हेल्थबाबत जागरूक झाला आहे.

फराळ (Faral) करताना सर्व जिन्नस हे पौष्टीक असते. पण तेलाचा वापर हा योग्य करायला हवा. अशावेळी फराळ करताना नेमकं कोणतं तेल वापरावं? असा प्रश्न पडतो. फराळ खाऊन जर वजन वाढू आणि फराळ हा हेल्दी व्हावा असे वाटत असेल तर, आहारतज्ज्ञ स्वाती बथवाल यांनी सांगितलेल्या तेलाचा वापर करा. शिवाय कोणतं वापरू नये, याचीही माहिती घ्या(Which is the healthiest oil for deep-frying and pan-frying? for Diwali faral).

डालडा आणि रिफाइंड तेल अजिबात वापरू नका

आहारतज्ज्ञांच्या मते, दिवाळीचा फराळ करताना सहसा लोक डालडा आणि रिफाइंड तेलाचा वापर करतात. पण या तेलाचा वापर अजिबात करू नये. यामुळे आरोग्य आणखीन बिघडू शकते. रिफाइंड तेल आणि डालडा शरीरातील खराब फॅट्स वाढवतात. ज्यांना रक्तदाबाची समस्या आहे त्यांच्यासाठी हे अधिक त्रासदायक ठरू शकतं.

आईबाबांनी फक्त ४ गोष्टी केल्या तर मुलं आयुष्यात डगमगणार नाहीत-खचणार नाहीत, जन्मभराची काळजी संपेल

ऑलिव्ह ऑइल

फ्राईड पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये. जर फराळ करत असाल तर,  ऑलिव्ह ऑइलचा वापर करा. ऑलिव्ह ऑईल हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. ज्यामुळे आरोग्य सुदृढ यासह केस आणि त्वचेला फायदा होतो. यातील इंफ्लेमेटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म, कोलेस्टेरॉल पातळी आणि रक्तदाब नियंत्रित राखण्यास मदत करते.

मोहरीचे तेल

दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी आपण मोहरीचे तेल वापरू शकता. आपण या तेलात चकली आणि चिवडा करू शकता. जर आपल्याला मोहरीचे तेल आवडत नसेल तर, देशी तुपाचा वापर करा.

जेवणानंतर 'ही' चूक केली तर पश्चाताप अटळ, वजन वाढते झरझर! ५ मिनिटं ‘एवढं’ करा...

दिवाळीत 'हा' नाश्ता करा

दिवाळीनिमित्त बहुतांश घरांमध्ये फराळ खातात. पण सकाळी फराळ करण्याऐवजी हलके पदार्थ खाऊन नाश्ता करा. आपण सकाळी पोहे, उपमा, इडली, डोसा, ढोकळा किंवा बेक्ड पदार्थ खाऊ शकता. तळलेले पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे फराळ शक्यतो सायंकाळच्या वेळेस खा.

टॅग्स :दिवाळी 2024कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न