ड्रायफ्रुटस मधील 'मनुका' लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी आवडीने खातात. वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पदार्थांमध्ये देखील आपण सुकामेवा म्हणून 'मनुका' घालतो. हेल्दी आणि निरोगी लाईफस्टाईलसाठी रोजच्या (Which Raisin Is Healthiest Black Yellow Green Or Red Check Details) डाएटमध्ये आहारासोबत रोज मूठभर (Which Raisin is Healthiest) ड्रायफ्रूट्स खाणे फायदेशीर मानले आहेत. मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतात(Black, green, golden or red Know the types of raisins and their benefits).
साधारणतः आपण पाहिले तर मनुक्यांच्या रंगांनुसार त्यांचे वेगवेगळे असे चार प्रकार असतात. बाजारात काळे, पिवळे, लाल, हिरवे इतक्या रंगांचे मनुके सहज विकत मिळतात. परंतु या सर्व मनुकांमध्ये कोणत्या रंगाच्या मनुक्यात कोणते गुणधर्म असतात आणि नक्की कोणता मनुका आपल्या आरोग्याासाठी सर्वात फायदेशीर मानला जातो, याबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. हिरवे, पिवळे, लाल आणि काळे मनुके यांच्यातील पोषक तत्व आणि पौष्टिकतेचे गुणधर्म भिन्न असतात, त्यामुळे आवडीने रोज मनुके खात असाल परंतु त्यातील कोणत्या रंगाचे मनुके आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत ते पाहूयात.
रंगानुसार मनुक्यांमध्ये कोणते गुणधर्म असतात ?
१. हिरवे मनुका :- हिरवे मनुके हे हिरव्या द्राक्षांपासून तयार करतात. द्राक्षांच्या लांबी आणि जाडीवरून मनुक्यांचा आकार आणि चव बदलू शकते. हिरव्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात लोह,अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. या पोषक तत्वांमुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच, मात्र मानसिक आरोग्यातही सुधारणा होते.
२. पिवळा मनुका :- पिवळा किंवा सोनेरी रंगाप्रमाणे दिसणारा मनुका हा चवीला गोड असतो. त्यामुळे विविध खाद्यपदार्थांमध्ये या मनुक्यांचा वापर जास्त होतो. विविध प्रकारच्या द्राक्षांपासून हे मनुके तयार केले जाते. पिवळ्या मनुक्यांचे देखील अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. पिवळे मनुके गोड असल्याने त्यात नैसर्गिक साखरचं प्रमाण अधिक असतं. मात्र असं असलं तरीही यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पचनक्रिया सुधारण्यासाठीही पिवळे मनुके फायद्याचे आहेत.
३. लाल मनुका :- लाल द्राक्षापासून लाल मनुके तयार होतात. जशी लाल द्राक्षांची चव ही आंबट गोड असते तशीच लाल मनुक्यांचीही चव बदलत जाते. लाल मनुक्यांमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असतात. लाल मनुक्यातल्या लोहामुळे रक्त शुद्ध व्हायला आणि वाढायला मदत होते तर व्हिटॅमिन सीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. फायबर्समुळे अन्न पचायला मदत होते. लाल मनुका हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानला जातो.
लोखंडी कढईत शिजवलेला पदार्थ काळा होतो? ६ टिप्स, मिळेल भरपूर लोह- भाजी काळीही होणार नाही...
४. काळ्या मनुका :- काळे मनुके हे काळ्या द्राक्षांपासून तयार केले जातात. काळ्या मनुक्यांची चवही आंबट गोड असते. मात्र काळ्या मनुका हा लाल मनुक्यांपेक्षा जास्त फायदेशीर मानला जातो, कारण यात लोहाचं प्रमाण अधिक असतं म्हणून त्यांचा रंगही काळा असतो. काळ्या मनुक्यांमुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच. मात्र रक्तदाबही नियंत्रित व्हायला मदत होते. काळ्या मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. जगभरातल्या लोकप्रिय मनुक्यापैकी काळा मनुक्याला पसंती अधिक असते.
कुडकुडणाऱ्या थंडीत करा 'उलटा वडापावचा' झक्कास बेत, नेहमीच्या वडापावपेक्षा भन्नाट नवी रेसिपी...
५. कोणत्या रंगाचे मनुके आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत ?
आपण पाहिलं की प्रत्येक रंगाच्या मनुक्यांमध्ये वेगवेगळे आरोग्यदायी गुणधर्म आहेत. मनुक्यांच्या रंगामुळे त्यांच्या पोषक तत्वांमध्ये सुद्धा बदल दिसून येतात. जसं हिरव्या रंगाच्या मनुक्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पिवळ्या मनुक्यामुळे रक्तातली साखर नियंत्रणात राहते. लाल मनुके हृदयासाठी फायद्याचे आहेत तर काळ्या मनुक्यांमुळे ॲनिमियासारखा आजार दूर व्हायला मदत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मनुका निवडू शकता. मनुके खाताना शक्यतो ते रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी ते खाल्ले तर जास्त फायदेशीर असतात. शिवाय एकाच वेळी जास्त प्रमाणात मनुके खाणे टाळा. रोज अगदी ५ ते ६ मनुके खाल्ले तरी चालतील.