Join us  

गव्हाची पोळी खावी की तीन-चार धान्य एकत्र करुन मल्टीग्रेन पोळी खाणं फायद्याचं? काय टाळलेलंच बरं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 9:13 AM

How To Make Chapati More Healthy?: तुम्ही नुसत्या गव्हाची पोळी करता की वेगवेगळी धान्य घालून मल्टीग्रेन पोळी करता? बघा यातलं नेमकं काय करावं.... (Multigrain roti or pure wheat roti?)

ठळक मुद्देआपण जी पोळी करतो ती अधिक पौष्टिक व्हावी, यासाठी आणखी काय करावे.......

पोळी हा बहुतांश भारतीयांच्या घरी अगदी दररोज होणारा पदार्थ. ही आपली नेहमीची पोळी अधिकाधिक पौष्टिक व्हावी, यासाठी गृहिणी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. अनेक घरांमध्ये गव्हाच्या कणकेत थोडं सोयाबिनही घातलं जातं. तर कुणी गव्हासोबतच थोडेसे मुगही दळून आणतात. जेणेकरून त्यातून प्रोटीन्स शरीराला मिळतील. पण अशी मल्टीग्रेन पोळी करणं चांगलं की नुसत्या गव्हाच्या पीठाचीच पोळी करावी (Which roti is more healthy? Multigrain roti or pure wheat roti?), याविषयी एका आहारतज्ज्ञांनी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

 

नुसत्या गव्हाची पोळी खावी की मल्टीग्रेन खावी?dt.lavleen या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्या स्वत: डाएटिशियन आहेत. त्यांच्यामते आपल्या शरीरासाठी वेगवेगळे धान्य एकत्र करून केलेली पोळी पचायला अवघड असते.

झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा....

त्यामुळे एकावेळी एकाच धान्याची पोळी खा. त्यात ज्वारी, नाचणी असं टाकून त्याला मल्टीग्रेन करू नका. यावर अनेक लोकांची बरीच वेगवेगळी मते आहेत. प्रत्येकाची प्रकृती आणि पचनशक्ती यानुसार गव्हाची पोळी करावी की मल्टीग्रेन हे वेगवेगळे असू शकते. पण आपण जी पोळी करतो ती अधिक पौष्टिक व्हावी, यासाठी आणखी काय करावे, याविषयीही या व्हिडिओमध्ये माहिती देण्यात आली आहे.

 

पोळी अधिक पौष्टिक होण्यासाठी काय करावे?

१. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पोळी पौष्टिक होण्यासाठी ती नॉनस्टिक तव्यावर भाजू नये. पोळ्या भाजण्यासाठी नेहमी लोखंडी तवाच वापरावा.

परिणीती चोप्रानं लग्नात घातलेलं हिऱ्यांचं देखणं 'आयरा' नेकलेस केवढ्याचं असेल? महागड्या दागिन्याची न्यारी गोष्ट...

२. दुसरी गोष्ट म्हणजे पोळ्या झाकण्यासाठी कपडा वापरावा. ॲल्युमिनियम फॉईलमध्ये किंवा कागदामध्ये पोळ्या गुंडाळू नयेत.

करिश्मा कपूरची ७० हजारांची बनारसी साडी, गर्भरेशमी साडीवर सिक्विन वर्क, अशी साडी सुरेख बाई..

३. पोळ्यांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोळ्या कणिक भिजवल्यानंतर कमीत कमी ५ मिनिटे तरी ती झाकून ठेवावी. यामुळे तिच्यातले पोषणमुल्य वाढते. 

 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स