Join us  

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2023 11:45 AM

Why is Sendha Namak allowed during fasts : उपवासा दरम्यान आपण जे पदार्थ खातो त्यात मिठाचे प्रमाण योग्य असले पाहिजे याचबरोबर नेमकं कोणतं मीठ खावं हे पाहूयात...

नवरात्रीला आता अवघ्या काही दिवसातच सुरुवात होणार आहे. नवरात्रीसोबत नऊ दिवस येणारे उपवास देखील सुरु होतील. नवरात्रीत उपवास करणारे बरेचजण असतात. या नवरात्रीत येणाऱ्या उपवासाचे प्रकार देखील वेगळे असतात. काहीजण सुरुवातीचे व शेवटचे दोन दिवस उपवास धरतात, तर काहीजण निर्जळी उपवास करतात यासोबतच काहीजण शेवटचे दोन दिवस उपवास करतात. उपवास करताना आपण उपवासाचे काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. हे नऊ दिवसाचे उपवास करताना आपण जे काही पदार्थ खातो ते काळजीपूर्वक खाल्ले पाहिजे. काहीवेळा यातील काही पदार्थ खाल्ल्यामुळे अ‍ॅसिडिटी, अपचन, पोटदुखी, आंबट ढेकर यांसारखे पोटाचे अनेक आजार उद्भवतात(Which salt is used during fasting?).

'मीठ' हा आपल्या आहारातील सगळ्यांत महत्वाचा घटक आहे. पदार्थ कोणताही असो त्यात मीठाचे योग्य प्रमाण असणे गरजेचे असते. उपवासा दरम्यान पदार्थात  मीठ घालताना देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. जर पदार्थात मीठाचे प्रमाण अधिक झाले तर जेवणाची चव बिघडू शकते. जसे मीठ पदार्थाची चव वाढवते तशीच (Why is consuming Sendha Namak allowed during fasting? Here are some health benefits of rock salt) ती बिघडवू देखील शकते. उपवासा दरम्यान आपण जे पदार्थ खातो त्यात मिठाचे प्रमाण योग्य असले पाहिजे. आहारतज्ज्ञ डॉक्टर निकिता कोली यांनी आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, उपवासा दरम्यान नेमके (Which Type of Salt is The Healthiest During Fasting ?) कोणते मीठ खावे याबद्दल सांगितले आहे. उपवास करताना नेमके कोणते मीठ खाणे शरीरासाठी योग्य आहे ते पाहूयात(Why is Sendha Namak consumed during Navratri fasts?).

उपवासा दरम्यान नेमके कोणते मीठ खावे ? 

१. मिठाचे बरेच प्रकार आहेत. साधे मीठ, सैंधव मीठ, खडे मीठ, बारीक मीठ असे अनेक प्रकार आहेत. परंतु जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे उपवास करतो तेव्हा साधे नेहमीचे मीठ न खाता, सैंधव मीठ खावे. 

२. आयुर्वेदानुसार उपवासा दरम्यान नेहमी सैंधव मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो.त्याचे मुख्य कारण असे की सैंधव मीठ हे वात अनुलोमन आहे. 

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

कोण म्हणतं साबुदाणा नको, खाऊन तर पाहा साबुदाण्याची बर्फी - उपवासासाठी स्पेशल एनर्जीचा डोस...

३. उपवासा दरम्यान आपल्याला काहीवेळा अपचन, अ‍ॅसिडिटी, पित्त तसेच वाताचा त्रास जाणवतो. उपवास करताना बरेचदा आपण काही काळ काही न खाता तसेच उपाशी पोटी राहतो. यामुळे काहींना पित्ताचा त्रास होतो. अशावेळी पित्त शामक म्हणून सैंधव मीठ फारच उपयोगी ठरते. 

४. उपवासा दरम्यान आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाईटची लेव्ह बॅलेन्स करण्यातही सैंधव मीठ अतिशय उपयोगी ठरते. सैंधव मीठ हे दोष शामक आहे. आपल्या शरीरातील सगळ्या प्रकारच्या दोषांचे शमन करण्यासाठी देखील सैंधव मीठ फायदेशीर ठरते. 

५. आपल्या पोटातील अग्नी प्रज्वलित करण्यातही सैंधव मीठ उपयोगी ठरते. उपवासा दरम्यान आपल्या शरीरातील जठराग्नीचे काम सुरळीत सुरु राहण्यासाठी सैंधव मीठ खाणे गरजेचे असते. यासाठी उपवासा दरम्यान साध्या मिठापेक्षा सैंधव मीठ खाणे अतिशय महत्वाचे असते.

टॅग्स :शारदीय नवरात्रोत्सव 2023अन्न