दिवाळी झाली आणि आता वातावरणात चांगलाच गारवा जाणवू लागला आहे. थंडीचा मौसम सुरू झाला की घरोघरी गुळाची (jaggery) मागणी वाढू लागते. कारण थंडीसाठी खास केल्या जाणाऱ्या लाडूमध्ये किंवा अन्य गोड पदार्थांमध्ये हमखास गुळाचा वापर केला जातो. शिवाय गूळ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसांत तो आवर्जून खाल्लाच जातो. शिवाय गुळामध्ये असणारे कॅल्शियम, झिंक, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी हे घटक तब्येतीसाठी गरजेचे असल्याने दररोजच्या आहारातही गूळ असायलाच पाहिजे (benefits of eating jaggery).
जेव्हा आपण गूळ खरेदी करायला जातो, तेव्हा बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पिवळट रंगापासून ते डार्क चॉकलेटी रंगापर्यंतच्या अनेक शेडचे गूळ मिळतात. गुळाचे असे वेगवेगळे रंग पाहून कोणता गूळ खरेदी करावा, असा प्रश्न पडतोच. मग आपण दुकानदाराच्या सांगण्यावर जातो आणि त्याने दिलेला गूळ घेताे. असं करण्यापेक्षा गुळाविषयी या काही महत्त्वाच्या गाेष्टी आधी माहिती करून घ्या आणि त्यानंतरच कोणत्या रंगाचा गूळ खरेदी करायचा ते ठरवा.
कोणत्या रंगाचा गूळ खाणे तब्येतीसाठी चांगले?१. इतर खाद्यपदार्थांमध्ये जशी भेसळ केली जाते, तशीच ती गुळामध्येही केली जाते. गुळात प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट मिसळलं जातं. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग गुळाचं वजन वाढविण्यासाठी तर सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग गुळाला चमकदार करण्यासाठी होतो.
चेहऱ्याच्या आकाराप्रमाणे करा परफेक्ट टिकलीची निवड, ५ टिप्स.. चेहरा दिसेल खुलून
२. जेव्हा गुळामध्ये हे दोन्ही घटक असतात, तेव्हा गुळाचा रंग चमकदार पिवळट दिसतो. त्यामुळे असा पिवळट रंगाचा आणि चमकदार, चकाकी असणारा गूळ घेणं टाळावं.
५२ हजारांची साडी आणि ७ हजारांचे झुमके, बघा माधुरी दीक्षितचा चंदेरी ऑर्गेंझा साडी लूक
३. जो गूळ काळपट चॉकलेटी रंगाचा असतो आणि ज्यावर कोणतीही चमक नसते, अशा गुळामध्ये भेसळ नसते. उसाच्या रसावर जेव्हा प्रक्रिया केली जाते, तेव्हा नैसर्गिक पद्धतीने गुळाला हा रंग प्राप्त होतो. त्यामुळे असा गूळ घेण्यास प्राधान्य द्यावे.