सकाळच्या नाश्त्याला काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो कारण सकाळच्यावेळी भरपूर भूक लागते.(Cooking Hacks) घाईच्यावेळी पटकन काय करावं असा प्रश्न अनेकांना पडतो. (How To Make White Dhokla) अशावेळी कमीत कमी साहित्यात किंवा कमीत कमी वेळेत तुम्ही पांढरा ढोकळा बनवू शकता. (How To Make Dhokla) पांढरा ढोकळा बनवायला एकदम साधा सोपा आहे. ढोकळा करण्यासाठी तुम्हाला फार साहीत्य लागणार नाही. अगदी कमीत कमी साहित्यात हा ढोकळा बनून तयार होईल. पांढरा ढोकळा खायला चवदार आणि एकदम सॉफ्ट असतो. (White Dhokla Recipe)
पांढरा ढोकळा कसा बनवायचा (Dhokla Making Tips)
१) भिजवलेले तांदूळ - १ कप
२) रवा- अर्धा कप
३) मीठ - चवीनुसार
४) साखर- १ चमचा
५) दही - १ कप
६) पाणी- गरजेनुसार
७) हिरव्या मिरच्या- १ टिस्पून
८) आलं- अर्धा टिस्पून
९) इनो- १ टिस्पून
फोडणीसाठी लागणारं साहित्य
१) तेल - १ टेबलस्पून
२) मोहोरी - १ टेबलस्पून
३) जीरं- १ टेबस्पून
४) हिंग - चिमूटभर
५) कढीपत्त्याची पानं- ४ ते ५
घरच्याघरी पांढरा ढोकळा कसा करायचा? (How To Make Soft Spongy White Dhokla)
१) पांढरा ढोकळा करण्यासाठी सगळ्यात आधी रवा, भिजवलेले तांदूळ, दही, मीठ, साखर हे पदार्थ एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यात मिरचीचे तुकडे, आलं घाला. एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरं, मिरची, कढीपत्याची बारीक केलेली पानं घालून फोडणी तयार करा. तयार फोडणी रवा, तांदूळाच्या मिश्रणात घाला. हे मिश्रण १० ते १५ मिनिटांसाठी सेट व्हायला बाजूला ठेवून द्या.
पावसाळ्यात साडी नेसल्यानंतर छत्री कशी पकडायची? पाहा Video-साडी खराब होणार नाही
२) त्यानंतर त्यात इनो फ्रुट सोडा आणि २ ते ३ थेंब पाणी घालून ढवळून घ्या. चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकजीव करा. त्यावर लाल तिखट चिमुटभर घालून पुन्हा चमच्याच्या साहाय्याने ढवळा. त्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि ढोकळा १० ते १५ मिनिटांसाठी वाफवण्यासाठी ठेवून द्या.
भाजीत मीठ जास्त पडलंय? खारटपणा कमी करण्यासाठी १ ट्रिक वापरा, परफेक्ट होईल स्वंयपाक
३) ढोकळा वाफवून झाला की चमच्याच्या साहाय्याने ढोकळ्याचे त्रिकोणी पिसेस वेगवेगळे काढून एका ताटात ठेवा. तयार आहे गरमागरम पांढरा ढोकळा. हा ढोकळा तुम्ही टोमॅटो आणि लाल मिरचीची चटणी किंवा खोबरं-पुदीन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता.