जगभरात ब्रेडचा वापर विविध पदार्थ करण्यासाठी केला जातो (White Bread v/s Brown Bread). चपाती किंवा भाकरी नसली की आपण ब्रेड किंवा पाव खातो. ब्रेड बटर, ब्रेड जाम, सॅण्डविच करण्यासाठी ब्रेडचा वापर होतो (Health tips). बाजारात दोन प्रकारचे ब्रेड मिळतात. एक ब्राऊन आणि दुसरे व्हाईट म्हणजेच मैद्यापासून तयार ब्रेड (White Bread). आजकाल बरेच फिटनेस फ्रिक लोक व्हाईट ब्रेड टाळून ब्राऊन ब्रेड खातात. पण ब्राऊन आणि व्हाईट ब्रेडमध्ये नेमका फरक काय?
खरंतर व्हाईट ब्रेड हा मैद्यापासून बनवला जातो आणि त्यामुळे फिटनेस फ्रिक लोकं हे ब्राऊन ब्रेड खाण्यास अधिक पसंती देतात. पण आरोग्यदायी पर्याय म्हणून मानला जाणारा ब्राऊन ब्रेड खरंच आरोग्यदायी आहे का? याची माहिती डॉक्टर मनन वोरा आणि आहारतज्ज्ञ भावेश गुप्ता यांनी दिली आहे(White Vs Brown Bread - Which One Should You Eat).
व्हाईट की ब्राऊन नक्की कोणता ब्रेड खावा?
- डॉक्टरांच्या मते, व्हाईट ब्रेड आणि ब्राउन ब्रेडमध्ये कॅलरीजचा फरक आहे. व्हाईट ब्रेडमध्ये ७० ते ८० कॅलरीज आणि ब्राऊन ब्रेडमध्ये ८० ते ९० कॅलरीज असतात. या दोन्ही ब्रेडमध्ये न्यूट्रिएंट्सचा देखील फरक आहे. व्हाईट ब्रेड अधिक प्रक्रिया केलेला ब्रेड आहे. व्हाईट ब्रेडमध्ये एंडोस्पर्म असतात. शिवाय यात स्टार्च देखील असते. त्यामुळे व्हाईट ब्रेडमध्ये कमी पोषक आढळते.
व्यायाम करताना थकवा जाणवतो? खा स्टॅमिना वाढवणारे ५ पदार्थ, दिवसभर वाटेल एनर्जेटिक - वजनही घटेल
- व्होल व्हीट ब्रेड आणि मल्टी ग्रेन ब्रेडमध्ये ब्रान म्हणजेच कोंडा असतो. जे प्रक्रियेच्या वेळीही तसेच राहतात. त्यामुळे त्यात अधिक पोषक असतात.
- व्हाईट ब्रेड मैद्यापासून तयार केला जातो, ज्यामुळे पचनक्रियेत अडथळे येतात. तर ब्राऊन ब्रेड हा गहू आणि इतर अनेक धान्ये मिसळून बनवला जातो. ज्यात फायबर, कार्बोहायड्रेट, साखर, प्रथिने हे सर्वच असते. व्होल ग्रेन ब्रेड खाल्ल्याने शरीरातील फायबरची कमतरता भरून निघते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
- व्हाईट ब्रेडची चव सुधारण्यासाठी त्यात कॉर्न स्टार्च आणि फ्रक्टोज कॉर्न सिरप मिसळले जाते. जे हेल्दी मानले जात नाही. त्यामुळे ब्रेडऐवजी आपण घरगुती चपाती खाऊ शकता.
२ बाळंतपणात वाढललेलं २३ किलो वजन कसं कमी केलं, नेहा धुपिया सांगते, आई झाल्यावर..
- जर आपण ब्रेड खात असाल तर, ब्रेड पॅकेटचे लेबल वाचणे गरजेचं आहे. रंगाच्या आधारे ब्रेड निवडण्याऐवजी ज्या ब्रेडमध्ये अधिक पोषक असतात अशा प्रकारचे ब्रेड खाणे उत्तम. कारण ब्राऊन ब्रेडचा रंग अधिक चमकदार आणि तपकिरी करण्यासाठी त्यामध्ये अनेक वेळा कृत्रिम रंग वापरले जातात. जे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.