Lokmat Sakhi >Food > कोण म्हणतं हिवाळ्यात ड्राय फ्रुटसच खायला हवेत? या 4 पालेभाज्या खा, आर्यन-कॅल्शियम भरपूर

कोण म्हणतं हिवाळ्यात ड्राय फ्रुटसच खायला हवेत? या 4 पालेभाज्या खा, आर्यन-कॅल्शियम भरपूर

काही भाज्या सर्व ऋतूत खाणं लाभदायक असतं तर काही भाज्या विशिष्ट ऋतुत खाल्ल्या तर त्याचा फायदा आपलं आरोग्य उत्तम राहाण्यास होतो. हिवाळ्यात मेथी, मोहरी, राजगिरा, चाकवत या चार पालेभाज्या अवश्य खायला हव्यात. थंडीत बाजरी, मका या उष्ण गुणधर्मांच्या भाकरीसोबत या पालेभाज्यांच्या पातळ भाज्या चविष्ट लागतात आणि आपली ताकद वाढवतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 06:48 PM2021-11-07T18:48:31+5:302021-11-07T18:50:02+5:30

काही भाज्या सर्व ऋतूत खाणं लाभदायक असतं तर काही भाज्या विशिष्ट ऋतुत खाल्ल्या तर त्याचा फायदा आपलं आरोग्य उत्तम राहाण्यास होतो. हिवाळ्यात मेथी, मोहरी, राजगिरा, चाकवत या चार पालेभाज्या अवश्य खायला हव्यात. थंडीत बाजरी, मका या उष्ण गुणधर्मांच्या भाकरीसोबत या पालेभाज्यांच्या पातळ भाज्या चविष्ट लागतात आणि आपली ताकद वाढवतात.

Who says you should only eat dry fruits in winter? Eat these 4 leafy vegetables, plenty of Aryan-Calcium | कोण म्हणतं हिवाळ्यात ड्राय फ्रुटसच खायला हवेत? या 4 पालेभाज्या खा, आर्यन-कॅल्शियम भरपूर

कोण म्हणतं हिवाळ्यात ड्राय फ्रुटसच खायला हवेत? या 4 पालेभाज्या खा, आर्यन-कॅल्शियम भरपूर

Highlightsमेथीची भाजी खाल्ल्यानं सांधे दुखीवर आराम पडतो. तसेच संधिवाताच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर ठरते.राजगिरा या पालेभाजीत लायसिन नावाचं महत्त्वाचं अमिनो अँसिड असतं. एजिंग रोखण्यास हा घटक उपयुक्त ठरतो.मोहरीची भाजी हिवाळ्यात खाणं प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. ही भाजी खाण्यास रुचकर तर लागतेच शिवाय तिच्यात उष्मांक आणि फॅटसही नसतात.

ऋतू जसा बदलतो तसा आहारही बदलतो. किंबहुना तो बदलायला हवा. थंडीतलं वातावरण सुखदायक असलं तरी या ऋतुमुळे होणार्‍या आजारांपासून वाचायचं असेल तर त्या प्रकारचे पदार्थ आपल्या जेवणाच्या ताटात असणं गरजेचं आहे. बदलेल्या ऋतुप्रमाणे आवश्यक असलेली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम आहारातील भाज्या, पालेभाज्या करत असतात. काही भाज्या सर्व ऋतूत खाणं लाभदायक असतं तर काही भाज्या विशिष्ट ऋतूत खाल्ल्या तर त्याचा फायदा आपलं आरोग्य उत्तम राहाण्यास होतो. हिवाळ्यात मेथी, मोहरी, राजगिरा, चाकवत या चार पालेभाज्या अवश्य खायला हव्यात. थंडीत बाजरी, मका या उष्ण गुणधर्मांच्या भाकरीसोबत या पालेभाज्यांच्या पातळ भाज्या चविष्ट लागतात आणि आपली ताकद वाढवतात.

थंडीत मेथी, मोहरी, राजगिरा या भाज्या खाल्ल्याने आरोग्यासोबतच त्वचाही निरोगी राहाते. तसेच या भाज्यांमधील गुणधर्म स्किन एजिंगची प्रक्रिया थांबवतात.

थंडीतल्या भाज्या

Image: Google

1 मेथी- मेथी ही औषधी भाजी म्हणून ओळखली जाते. या भाजीत अ, क , ब6 जीवनसत्त्व, पोटॅशिअम, फॉलिक अँसिड, फॉस्फरस, लोह ही पोषणमूल्यं असतात. थंडीत मेथीची भाजी खाल्ल्यानं सांधे दुखीवर आराम पडतो. तसेच संधिवाताच्या रुग्णांसाठी ही भाजी फायदेशीर ठरते. या भाजीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल आणि साखरेचं प्रमाण नियंत्रित राहातं. मेथीच्या भाजीच्या सेवनानं रक्ताच्या गुठळ्या बनण्याचा धोकाही कमी होतो.

Image: Google

2. मोहरीची भाजी- थंडीत मोहरीची पातळ भाजी आणि मक्याची भाकरी खाण्याचा मोह फक्त उत्तर भारतातल्या किंवा पंजाब हरियाणातल्या लोकांनाच होतो असं नाही. ही भाजी या ऋतूत खाणं प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. ही भाजी खाण्यास रुचकर तर लागतेच शिवाय तिच्यात उष्मांक आणि फॅटसही नसतात. मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वं, खनिजं आदी पोषक घटक असलेली ही भाजी खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. या भाजीत असलेला पोटॅशिअम हा घटक आपली हाडं मजबूत करतो. संधिवात, सांधेदुखी यात मोहरीची भाजी खाणं फायदेशीर ठरते. तसेच वजन कमी करण्यासाठी ही भाजी थंडीत खायलाच हवी.

Image: Google

3. राजगिरा- राजगिरा या पालेभाजीत लायसिन नावाचं महत्त्वाचं अमिनो अँसिड असतं. एजिंग रोखण्यास हा घटक उपयुक्त ठरतो. या भाजीत फायटोन्यूट्रीएंटस, खनिजं आणि अनेक जीवनसत्त्व असतात. थंडीत ही भाजी अनेक प्रकारच्या संसर्गापासून शरीराचं संरक्षण करते.

Image- Google

4. पालक- ही भाजी प्रत्येक ऋतूत खायला हवी आणि थंडीत तर आवर्जून खाल्लीच पाहिजे. पालकामधे फायबर, कर्बोदकं, लोह, प्रथिनं, ओमेगा 3, ओमेगा 6 ही महत्त्वची पोषक घटक असतात. ही भाजी हदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक असून केस आणि त्वचेचं आरोग्यही ही भाजी सांभाळते. शरीरातील रक्ताची कमतरता या भाजीने भरुन निघते. तसेच अनेक रोगांशी लढण्याची ताकद पालकाच्या गुणधर्मात असते.

हिवाळा हा ऋतू आरोग्य कमावण्याचा असतो. हे आरोग्य कमावण्यासाठी बदाम, अक्रोड, अंजीर यांच्याबरोबरीने या चार पालेभाज्याही तितकीच मदत करतात. त्यामुळे हिवाळ्यात या भाज्या खाणं आपल्याकडून चुकणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

Web Title: Who says you should only eat dry fruits in winter? Eat these 4 leafy vegetables, plenty of Aryan-Calcium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.