Lokmat Sakhi >Food > चपाती कोणी खावी कोणी खाऊ नये? चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात......

चपाती कोणी खावी कोणी खाऊ नये? चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात......

Is eating chapati daily good for health : सध्या ग्लुटेन फ्री पदार्थांचा ट्रेंड असल्यानं चपाती खाणं बरेचजण टाळतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 02:45 PM2023-02-05T14:45:39+5:302023-02-05T14:50:43+5:30

Is eating chapati daily good for health : सध्या ग्लुटेन फ्री पदार्थांचा ट्रेंड असल्यानं चपाती खाणं बरेचजण टाळतात.

Who should eat chapati and who should not? Ayurveda experts say for good health... | चपाती कोणी खावी कोणी खाऊ नये? चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात......

चपाती कोणी खावी कोणी खाऊ नये? चांगल्या आरोग्यासाठी आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात......

बऱ्याच लोकांच्या रोजच्या जेवणात चपाती असते. चपाती  खाऊन कंटाळा आला किंवा काही नॉनव्हेजचा बेत असेल तर भाकरी बनवली जाते. वजन कमी करण्यासाठी बरेच लोक चपाती खाणं सोडतात.  (Is eating chapati daily good for health) सध्या ग्लुटेन फ्री पदार्थांचा ट्रेंड असल्यानं चपाती खाणं बरेचजण टाळतात. तर काहींना चपातीशिवाय जेवणच जात नाही चपाती कोणी खावी कोणी खाऊ नये. याबाबत आयुर्वेद तज्ज्ञांनी अधिक माहिती दिली आहे. (Who should eat chapati and who should not? Ayurveda experts say for good health)

१) भाकरी आणि चपाती आपल्या आहाराचा अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे भाकरी किंव चपातीची निवड करताना काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. चपाती आणि भाकरी कोणी, कधी खावी समजून घ्या. आयुर्वेदानुसार गहू हा शीत आणि स्गिग्ध आहे. वात आणि पित्त नियंत्रणात ठेवून शरीरात स्थिरता निर्माण करण्याचे काम गव्हामुळे होते. 

२) जर तुम्हाला वाताचा किंवा पित्ताचा त्रास असेल किंवा शरीराची वाढ करायची असेल तर  गव्हाचा आहारात समावेश करू शकता. पण गहू हा पचायाल जड असतो. चपातीपेक्षा फुलके पचायला हलके असतात. त्यामुळे चपातऐवजी तुम्ही फुलके खाऊ शकता. 

३) सर्वच प्रकारच्या भाकरी पचायला हलक्य असतात. पण ज्यांना वाताचा त्रास आहे  त्यांनी भाकरी खाणं टाळावं.  भाकरी बनवताना ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी अशा वेगवेगळ्या प्रकारची पीठं वापरली जातात. त्यामुळे भाकरी खाणं तब्येतीसाठी उत्तम ठरते. 
 

Web Title: Who should eat chapati and who should not? Ayurveda experts say for good health...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.