हिवाळ्यात हिरवेगार पेरू खाण्याची इच्छा सर्वांचीच होते. पेरू हे आरोग्यासाठीही खूप चांगले मानले जाते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबरसह अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यापासून ते पचनसंस्थेसाठी आणि अगदी वजन कमी करण्यासाठी हे खूप चांगले फळ मानले जाते. (Who should not eat guava) पेरूचे इतके फायदे असूनही काही लोकांसाठी पेरूचे सेवन करणे योग्य मानले जात नाही. केंद्र सरकारच्या ईएसआयसी रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ रितू पुरी यांनी एका हिंदी वेब पोर्टलशी बोलताना पेरू खाणं कोणी टाळायला हवं ते सांगितलं आहे. (People who should be careful about eating Guava)
गॅसचा त्रास असेल तर पेरू खाऊ नका
१) जर तुम्हालाही गॅस, एसिडीटी जाणवत असेल तर पेरू अजिबात खाऊ नका. यात व्हिटामीन सी, फ्रुक्टोज मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे अन्न पचन संथ होते अशा स्थितीत ब्लोटींग किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
वरण-भातासोबत खायला करा खमंग, कुरकुरीत कारल्याचे काप; ही घ्या सोपी रेसेपी
२) जर तुम्हाला हायपोग्लायसेमियाची समस्या असेल तर तुम्ही पेरू खाऊ नये. हायपोग्लायसेमिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा खूपच कमी होते. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स खूपच कमी असल्याने तो साखर रुग्णांसाठी चांगला मानला जातो.
सर्दी-खोकल्याने हैराण झालात? १ उपाय, व्हायरल इंफेक्शनचा वारंवार होणारा त्रास होईल कमी
3) जर तुम्हाला वारंवार पोटाचा त्रास होत असेल. विशेषतः जर तुम्हाला वारंवार जुलाब होत असतील तर पेरूचे सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कारण पेरूमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. ज्यामुळे तुमची डायरियाची समस्या आणखी वाढू शकते.
४) शस्त्रक्रिया होणार असेल तर तुम्ही पेरू खाणे टाळावे. विशेषतः शस्त्रक्रियेच्या किमान आठ ते दहा दिवस आधी पेरू खाणे बंद करा. वास्तविक, पेरू तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतो. त्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला पेरूचे सेवन करायचे असेल तर एकदा तज्ज्ञांना विचारा.
५) आजकाल दातदुखीचा त्रास होत असेल तर काही दिवस पेरू खाणे टाळण्याचा प्रयत्न करा. पेरू सहसा कडक असतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही पेरूचे सेवन केले तर तुमच्या वेदना आणखी वाढण्याची शक्यता आहे.