Join us  

ना मैदा-ना सोडा, कपभर गव्हाच्या पिठाची आप्पे पात्रात करा खुसखुशीत नानकटाई, पौष्टीक रेसिपी-टिकेल महिनाभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 12:53 PM

Whole wheat nankhatai recipe / Healthier festival nankhatais : गव्हाच्या पिठाची नानकटाई, ती पण आप्पे पात्रात? कधी करून पाहिलं आहे का?

दसऱ्यानंतर अनेकांकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरु होते. साफसफाई, फराळ, शॉपिंग या सगळ्या गोष्टी करण्यात १५ दिवस तरी आरामात जातात. सफाईनंतर महिलावर्ग फराळातील विविध पदार्थ तयार करायला घेतात. त्याची पूर्व तयारी करतात. चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी, लाडू, अनारसे, नानकटाई यासह इतर पदार्थ तयार करतात.

अनेकांना खुसखुशीत नानकटाई खायला आवडते. परंतु, परफेक्ट नानकटाई सर्वांनाच करायला जमेल असेही नाही. नानकटाई करताना अनेक जण मैद्याचा वापर करतात. पण आपण मैद्याचा वापर न करताही नानकटाई करू शकता. गव्हाच्या पिठाची नानकटाई कशी करायची? ते ही आप्पे पात्रात पाहा सोपी कृती(Whole wheat nankhatai recipe / Healthier festival nankhatais).

गव्हाच्या पिठाची नानकटाई करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

पिठीसाखर

बेसन

रवा

ग्रीन ढोकळा कधी खाल्लाय का? कपभर बेसन-पालकाची करा उत्कृष्ट रेसिपी-पालक न खाणारेही आवडीने खातील

मीठ

वेलची पूड

तूप

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप पिठीसाखर घ्या, त्यात अर्धा कप रवाळ तूप घालून मिक्स करा. निदान ४ ते ५ मिनिटं तरी एका बाजूने फेटून घ्या. क्रिमी बॅटर तयार झाल्यानंतर त्यावर चाळण ठेवा. त्यात एक कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन, पाव कप रवा, चिमुटभर मीठ, एक चमचा वेलची पावडर व एक चमचा बेकिंग पावडर घालून सर्व साहित्य एकत्र चाळून घ्या. साहित्य चाळून घेतल्यानंतर चमच्याने मिक्स करा. नंतर हाताने घट्टसर पीठ मळून घ्या. हवं असल्यास पीठ मळताना आपण तुपाचा वापर करू शकता. पीठ मळताना शक्यतो पाणी आणि दुधाचा वापर करणं टाळावे.

पारंपारिक आगरी पद्धतीची भाकरी करताना लक्षात ठेवा १ युक्ती, भाकरी होईल मस्त

कणिक मळून झाल्यानंतर छोटे छोटे अलगद हाताने गोळे तयार करा, व तयार गोळे आप्पे पात्रात ठेवा, व गोळ्यांवर काजू-बदामाचे काप ठेवा. जर आपलं आप्पे पात्र नॉन स्टिक नसेल तर, त्यावर तूप लावून ग्रीस करा. जेणेकरून नानकटाई आप्पे पात्रात चिकटणार नाही. दुसरीकडे गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर आप्पे पात्र ठेवा, व पात्रावर झाकण ठेऊन २० मिनिटांसाठी नानकटाई बेक करून घ्या. त्यानंतर गॅस बंद करा, व चमच्याने नानकटाई पलटवून घ्या. नंतर १० मिनिटांसाठी दुसऱ्या बाजूनेही मिडीयम फ्लेमवर बेक करून घ्या. अशा प्रकारे गव्हाच्या पिठाची खुसखुशीत नानकटाई खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :दिवाळी 2023कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न