Join us  

भूक लागली? कपभर गव्हाचं पीठ-२ कांद्याचे करा झटपट कांदा पराठा; १० मिनिटात डिश रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2024 2:37 PM

Whole wheat Onion paratha recipe in 10 minute : असा बनवा खमंग पौष्टिक कांदा पराठा, नाश्ता-लंच-डिनर; तिन्ही वेळेस खाऊ शकता..

लहानग्यांपासून थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकाला नाश्ता किंवा लंचमध्ये पराठा खायला आवडते (Paratha). पराठा अनेक प्रकारचे केले जातात. मेथी, पालक, बटाटा, कोबी, डाळी, मिक्स व्हेज पराठा आपण करतोच. पण बऱ्याचदा घरात भाजी नसते, तेव्हा भाजीशिवाय पराठा कसा तयार करायचा असा प्रश्न पडतो (Cooking Tips).

जर आपल्याला भाज्यांचा पराठा आवडत नसेल किंवा, घरात भाजी उपलब्ध नसेल तर, आपण चविष्ट कांदा पराठा तयार करू शिकता. बऱ्याचशा घरात कांदा बाराही महिने उपलब्ध असते. जर घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा, भाजीचा पराठा खायचा नसेल तर, चविष्ट कांदा पराठा करून खा. आपण हा पराठा नाश्ता, लंच किंवा डिनरमध्ये खाऊ शकता(Whole wheat Onion paratha recipe in 10 minutes).

चविष्ट कांदा पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य

गव्हाचं पीठ

कांदे

कोथिंबीर

लाल तिखट

धणे पूड

हळद

ना गॅस-ना पापड खार, उरलेल्या भाताचे करा कुरकुरीत पापड; १५ मिनिटात बनतील ५० पापड

मीठ

ओवा

तेल

कृती

सर्वप्रथम, परातीमध्ये २ कप गव्हाचं पीठ चाळून घ्या. नंतर त्यात २ मोठे कांदे बारीक चिरून घाला. मग बारीक चिरलेली कोथिंबीर, एक चमचा लाल तिखट, एक चमचा धणे पूड, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा ओवा आणि एक चमचा गरम तेल घालून मिक्स करा. नंतर हळूहळू पाणी घालून कणिक मळून घ्या. शेवटी पुन्हा अर्धा चमचा तेल घालून कणिक मळून घ्या.

ना उडीद डाळ -ना सोडा; १५ मिनिटात करा इन्स्टंट मेदू वडे; ऑथेटिंक चव, क्रिस्पी वडे

कणिक मळून झाल्यानंतर पोळपाट घ्या. पोळपाट्यावर एक चमचा तेल लावून पसरवा. कणकेचा एक गोळा घ्या, व लाटण्याने थोडे जाडसर लाटून पराठा तयार करा. गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवा. तव्यावर पराठा घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे चविष्ट कांदा पराठा खाण्यासाठी रेडी. आपण हा पराठा चटणीसोबत खाऊ शकता. शिवाय टिफिनलाही देऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स