Join us  

चपातीचा चिवडा; शिळ्या चपात्यांचा कुस्करा करण्याची कुरकुरीत रेसिपी, चविष्ट आणि झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2023 1:07 PM

whole wheat roti chivda recipe | Indian chapati recipe शिळ्या चपातीचं करा चटपटीत चिवडा, पोट भरेल - चवीलाही भन्नाट लागेल..

जेवणाच्या थाळीत चपाती, भात, भाजी, डाळ हे पदार्थ असतातच. गृहिणी नेहमी एक्स्ट्रा चपात्या तयार करते. काही वेळेला भूक कमी असल्यामुळे मुलं चपाती कमी खातात, किंवा खाणं टाळतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या चपात्यांचं काय करावं सुचत नाही. नाश्त्यामध्ये मुलं नेहमी काहीतरी चटपटीत बनव अशी फर्माईश करतात. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्यांना चपातीचा चिवडा तयार करून देऊ शकता. चपातीचा चिवडा, शिळ्या चापातींपासून तयार करण्यात येते. त्याला कांद्याची फोडणी दिली की मग, हा पदार्थ चवीला भन्नाट लागतो. चला तर मग खमंग - चविष्ट - हेल्दी पदार्थाची कृती पाहूयात(whole wheat roti chivda recipe | Indian chapati recipe).

चपातीचा चिवडा करण्यासाठी लागणारं साहित्य

शिळ्या चपाती

तेल

जिरं

कडीपत्ता

करा बटाट्याचा रस्सा, म्हणाल अशी गावरान ठसक्याची झणझणीत भाजी कधी खाल्ली नव्हती!

हिरवी मिरची

शेंगदाणे

कांदा

मीठ

हळद

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, शिळ्या चपातीचे तुकडे करा, मिक्सरचं भांडं घ्या, त्यात शिळ्या चपातीचा चुरा तयार करा. चपातीचा चुरा एका प्लेटमध्ये काढून ठेवा. दुसरीकडे पॅनमध्ये २ चमचे तेल घालून गरम  करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा जिरं, कडीपत्ता, व बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून भाजून घ्या.

साखर-तूप-गुळ न घालता करा प्रोटीन लाडू, केस गळणे-थकवा-स्किन प्रॉब्लम्स होतील कमी

त्यानंतर त्यात एक कप शेंगदाणे, एक बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद, व चपातीचा तयार चुरा घालून साहित्य एकजीव करा. २ मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा, एक वाफ आल्यानंतर गॅस बंद करा. शेवटी कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स