Join us  

वरण-भातावर 'हा' पदार्थ घालून खा; रोजचं साधं वरण होईल अमृतासमान, थकवा-कमजोरी होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 3:38 PM

Adding Lemon To Your Dal Makes It Healthier :

तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलात तरी वरण-भात (Dal-Rice) हेच तुमचं फेव्हरेट अन्न असेल. प्रत्येक घरात वरण बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. काही लोक सांबारमध्ये भरपूर भाज्या घालून डाळ शिजवतात तर काहीजण फक्त तूप आणि जीऱ्याची फोडणी देऊन डाळ शिजवतात. काहींना फोडणी देऊन वरण-भात खायला आवडतो. डाळ आपल्या आहाराचा एक महत्वपूर्ण भाग आहे. (Why Adding Lemon To Your Dal Makes It Healthier Rich in Iron Content Nutritionist Explains)

डाळ प्रोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. डाळीत भरभरून न्युट्रिशन्स असतात. वेट लॉस एक्सपर्ट सकिना मुस्तान सिर सांगतात की डाळ आयर्नचा सर्वात चांगला स्त्रोत आहे. डाळ खाल्ल्यानं शरीरातील आयर्न शोषण्यास मदत होते. साधी मीठ घालून केलेली डाळ अधिकच टेस्टी बनते. 

मलायका अरोराचे केस पन्नाशीतही इतके दाट-सुंदर कसे? ती केसांना लावते स्वयंपाकघरातले २ पदार्थ, दाट केसांचं सिक्रेट

सात्विक.ईन च्या रिपोर्टनुसार डॉ. दीक्षा भावसार सांगतात की डाळ शिजवण्याआधी भिजवून ठेवल्यास पचनक्रिया चांगली राहते आणि न्युट्रिशनचे शोषण चांगले राहते. डाळी भिजवल्यानं त्यातली फायटीक एसिड आणि टेनिन्स काढून टाकले जाते. ज्यामुळे गॅस, ब्लॉटींग उद्भवू शकते. जास्तीत जास्त आरोग्यदायी फायदे मिळवण्यासाठी डाळी शिजवण्याआधी भिजवलेलं चांगलं ठरतं. 

डाळीच्या सेवनानं आयर्नची कमतरता दूर होते

डाळ प्लांट बेस्ड आयर्नचा एक चांगला स्त्रोत आहे. जे एक आवश्यक मिनरल आहे. याच्या सेवनानं शरीरात एनिमियाची स्थिती उद्भवत नाही आणि शरीरात एनर्जी लेव्हल टिकून राहते. लाईफस्टाईल फाऊंडर डॉ. रोहिणी पाटील यांनी सांगितले की डाळीसोबत  प्लांट बेस्ड स्त्रोतांमध्ये आढळणाऱ्या आयर्नच्या स्त्रोतांना नॉन हिम आयर्नच्या रूपाने ओळखले जाते.

प्रोटीनचा खजिना फक्त १० रूपयांत; किचनमधले २ पदार्थ रात्री भिजवून खा, ताकद येईल, सद्गुरूंचा सल्ला

डाळीला पॉवरफूल बनवण्यासाठी त्यात लिंबू मिसळा

डॉ. पाटील यांनी सांगितले की व्हिटामीन सी नॉन हिम आयर्नच्या अवशोषणाला प्रोत्साहन देण्यास मदत करतात. ज्यामुळे डाळीतील आयर्नची उपलब्धता वाढते. तुम्ही डाळीत लिंबू घालून शरीराला आवश्यक असलेल्या मिनरल्सची कमतरता भरून काढू शकता. 

डाळीत लिंबू पिळून खाण्याचे फायदे

लिंबू पिळून खाल्ल्याने पोषणाव्यतिरिक्त पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. लिंबू घातल्याने  लहान मुलांनाही डाळीची चव  आवडेल. याव्यतिरिक्त डाळीचा आंबटपणा डाळीत मिसळल्या जाणाऱ्या मसाल्यांमध्ये एकत्र होतो.  त्यामुळे वरणाला चांगली चव लागते.

मलायका अरोराचे केस पन्नाशीतही इतके दाट-सुंदर कसे? ती केसांना लावते स्वयंपाकघरातले २ पदार्थ, दाट केसांचं सिक्रेट

लिंबातील व्हिटामीन सी इम्यून सिस्टिम मजबूत बनवण्यास मदत करते. ज्यामुळे त्वचेचा ग्लो वाढतो आणि शरीरात आयर्नचे प्रमाण नियंत्रणात राहते. डॉ. पाटील सांगतात की व्हिटामीन सी फ्री रॅडिकल्सना निष्क्रीय करते. शरीरात कोलोजनचं निर्माण वाढते आणि इम्यूनिटी चांगली राहते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स