उन्हाळ्यात घाम गाळून-गाळून आपण वजन कमी करतो. उन्हाळ्यात पाणी जास्त प्यायले जाते. भरपूर पाणी प्यायल्याने अन्नावर नियंत्रण राहते. नंतर पावसाळा येतो. त्यामध्ये पाऊस पडायला लागल्यावर भजी, वडा, चहा जिभेला हवेहवासे वाटायला लागतात. त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो.(why are we always hungry during winters ?.. here's why) मात्र हिवाळ्यात भूक खूपच कडाक्याची लागते. हिवाळा सुरू झाला की , व्यायामाचे दिवस आले असे म्हटले जाते. असं का बरं? थंडीच्या दिवसात अचानक वजन वाढायला लागते. नेहमी पेक्षा जास्त भूक लागते. थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावरही भुकेचे प्रमाण वाढते. मग भस्म्या झाला की काय असं वाटायला लागतं. (why are we always hungry during winters ?.. here's why)कारण खाल्याशिवाय मनाला आणि पोटाला शांतता मिळतच नाही. झोप लागत नाही. पण थंड हवेत असं का होतं? त्याची काही कारणं आहेत. तुम्हाला काहीही आजार झालेला नाही. थंडीच्या दिवसात नको तेवढी भूक लागतेच. त्याची कारणे पुढीलप्रमाणे-
१. अचानक बाहेरील वातावरण थंड व्हायला लागल्यावर, शरीर त्यावर प्रतिक्रिया देते. शरीराला जेवढ्याप्रमाणात ऊर्जा हवी असते, ती मिळत नाही. शरीराला ऊब कमी पडायला लागते. मग शरीराची पचनसंस्था जास्त अन्नाचा वापर करून शरीरासाठी ऊर्जा निर्माण करते. शरीरातील हिट कायम ठेवण्यासाठी या अन्नाचा वापर शरीर करते. त्यामुळे नेहमीपेक्षा कमी वेळात अन्न पचून जाते. मग लवकर भूक लागते. शरीरातील कॅलेरीज बर्न होतात.
२. शरीराला कार्बोदकांची गरज जास्त भासायला लागते. त्यामुळे पटकन पोट भरण्यासाठी आपण अरबट-चरबट खातो. त्याने जास्त फॅट्स मिळतात. त्यामुळे पोट लगेच भरून जातं.
३. शरीरातील सेरोटोनिनची कार्यक्षमता कमी होते. सेरोटोनिन म्हणजे शरीरातील एक हार्मोन आहे, जो आरोग्य व मन यांच्यातील संतुलन राखण्याचे काम करतो. स्वभावातील बद्दल या हार्मोनमुळेच घडतो. सेरोटोनिनवर सूर्यप्रकाशाचा परिणाम होतो. त्याला उष्णता लागते. थंडीत सूर्यप्रकाश कमी मिळतो. त्यामुळे त्याचे संतुलनाचे कार्य कमी होते. म्हणून आपल्याला जास्त फॅट्सनी भरलेलं अन्न खायची इच्छा होते. उष्ण पदार्थ खाण्यासाठी सेरोटोनिन आपल्याला परावृत्त करते.
गरमागरम सूप, ताजा-ताजा चहा, मस्त परतलेल्या भाज्या असं खाऊन, हे क्रेव्हींग्ज कमी करता येतात. त्यामुळे अशी थंडीत भूक लागल्यावर मन मारू नका. खा आणि नंतर व्यायाम करा.