जगभरातल्या आणि भारतातल्याही फूडबाबतची गुगल सर्च यादी सांगते की , लोकांनी जे पदार्थ शोधले आहेत त्यावरुन कोरोना विरुध्द केलेल्या लसीकरणामुळे लोकांमधे एक आत्मविश्वास आलेला आहे. लोकं आपल्या आरोग्याबाबत जागरुक झालेले आहेत. त्यामुळेच पोटॅटो सूप, पालक सूप, बेक्ड ओट्स , ओव्हरनाइट ओट्स, काढा यासारख्या पौष्टिक पदार्थांचा, औषधी पेयांचा शोध प्रामुख्यानं घेतला गेला.
2021 हे वर्ष जस जसं शेवटाकडे चाललंय तसं तसं थोडं मागे वळून काय घडलं हे पाहाण्याची प्रक्रिया सगळीकडेच सुरु झाली आहे. ही प्रक्रिया व्यक्तिगत पातळीवर जशी सुरु आहे तशीच संस्थात्मक, कार्यालयीन आणि व्यावसायिक पातळीवरही सुरु आहे. पण संपूर्ण जगाचं लक्ष असतं ते गुगल सरत्या वर्षाचं करत असलेल्या विश्लेषणाकडे. हे विश्लेषण गुगल प्रत्येक क्षेत्राच करतं. गुगलनं केलेल्या विश्लेषणावरुन एकूणच सरत्या वर्षाचा स्वभाव कळतो. येत्या नव्या वर्षाबद्दल काही अंदाज बांधता येतात.
Image: Google
गुगलवर जगभरातील लोकांनी काय काय शोधलं याच्या आधारावर हे विश्लेषण असतं. ते मनोरंजन, बातम्या, गेम्स, गाणी, खेळ, टीव्ही शोज अशा वेगवेगळ्या क्षेत्राबाबत गुगलवर लोकांनी सर्वात जास्त काय शोधलं हे बघून त्या त्या क्षेत्रात सरत्या वर्षात काय महत्त्वाचं होतं हे लक्षात येतं.
खाण्याच्या बाबतीत गुगलवर जगभरातून काय शोधलं गेलं हे तर आहेच शिवाय भारतातल्या लोकांनी गुगलवर सर्वात जास्त कोणत्या पदार्थांचा शोध घेतला हे देखील उलब्ध आहे. गुगलचे फुड क्षेत्रातील जगभरातल्या शोधाचे आकडे सांगतात, की 2021 मध्ये मेक्सिकन डिश बिरिआ टाकोज या पदार्थाचा शोध सर्वात जास्त घेतला गेला. त्यानंतर नासि गॉरेंग आणि फेता पास्ता हे पदार्थ शोधले गेले. सर्वात जास्त शोधल्या गेलेल्या या पदार्थांच्या यादीत शोगायाकी, पोटॅटो सूप, टेरियाकी अँम्बरजॅक, टॉनजिरु, बेक्ड ओटस आणि ओव्हरनाइट ओटस या पदार्थांचाही समावेश आहे.
तर भारतात लोकांनी गुगलवर एनोकी मश्रूम, मोदक, मेथी मटार मलाई, पालक, सूप, चिकन सूप, पॉर्न स्टार मार्टिनी, लसांजे, कुकीज, मटर पनीर आणि काढा हे पदार्थ आणि पेयं सर्वात जास्त शोधले गेले.
Image: Google
जगभरातल्या आणि भारतातल्याही फूडबाबतची गुगल सर्च यादी सांगते की , लोकांनी जे पदार्थ शोधले आहेत त्यावरुन कोरोना विरुध्द केलेल्या लसीकरणामुळे लोकांमधे एक आत्मविश्वास आलेला आहे. लोकं आपल्या आरोग्याबाबत जागरुक झालेले आहेत. त्यामुळेच पोटॅटो सूप, पालक सूप, चिकन सूप, बेक्ड ओट्स , ओव्हरनाइट ओट्स , काढा यासारख्या पौष्टिक पदार्थांचा, औषधी पेयांचा शोध प्रामुख्यानं घेतला गेला. ज्याप्रकारे भारतातल्या लोकांनी लसांजे, कुकीज हे पदार्थ गुगलवर शोधले त्यावरुन लॉकडाऊन नियम शिथील केल्यानंतरचा सगळ्यांमधला टेन्शनमुक्तीचा आनंदही या शोधात झळकला. जरा मोकळेपणानं वागण्याचा उद्देश लोकांच्या या शोधातून प्रतिबिंबित झाला.
गुगलवर जगभरात सर्वात जास्त शोधले गेलेले पदार्थ
Image: Google
1. बिरिआ टाकोज:-हा मेक्सिकन पदार्थ आहे. हा पदार्थ जगभरात व्हायरल झाला तो टिकटॉकच्या कृपेने. पारंपरिक टाकोजमधे आधी मंद आचेवर शिजवलेलं मांस घालतात. बिरिआ टाकोज हे मेक्सिकन फूड जगभरातून गुगलवर शोधलं गेल आणि ते प्रसिध्द देखील झालं.
Image: Google
2. नासि गोरेंग:- आग्नेय आशियातील लोकप्रिय फ्राइड राइस आहे. तो प्रामुख्याने मलेशिया आणि इंडोनेशियामधे खाल्ला जातो. विविध भाज्या आणि मांस घालून तयार होणारा हा फ्राइड राइस अगदी सोपा आहे.
Image: Google
3. फेटा फास्टा: बेकरीत भाजलेला पास्त फेटा चिज घालून दिला जातो. फेटा पास्टा हा पदार्थही टिकटॉक व्हिडीओजमुळे जगभर पसरला. यात पास्ता , फेटा चिज यासोबतच ताजे चेरी टोमॅटो, ऑलिव्ह ऑइल, तुळस, लसूण यांचा वापर करुन हा साधा सोपा पदार्थ केला जातो.
Image: Google
4. शोगायाकी: ही जपानी डिश आहे. शोगा म्हणजे आलं आणि याकी म्हणजे भाजणं किंवा तळणं. शोगायाकीत मांस, आलं, सोयासॉस, कांडा, लसूण आणि साखर हे मुख्य घटक असतात.
Image: Google
5. पोटॅटो सूप: पोटॅटो सूप हे आर्यलण्डमधील लोकप्रिय सूप आहे. आरोग्याच्या दृष्टीने या सूपला खूप महत्त्व दिलं जातं. या सूपमधे बटाट्याचे तुकडे, क्रीम किंवा साखर नसलेलं कन्डेस्न्ड मिल्क ( एव्हॅपोरोटेड मिल्क), बटर, मक्याचं पीठ, भाज्या, कांदा, सेलरी, गाजर यांचा वापर केला जातो.
Image: Google
6. टेरियाकी अँम्बरजॅक: हा जपानमधील पदार्थ आहे. आहे. टेरियाकी म्हणजे जपनामधील स्वयंपाकाची एक पध्दत ज्यात पदार्थ खूप उकळवला किंवा भाजला जातो. तर अँम्बरजॅक हा अटलॅंटिक आणि पॅसिफिक समुद्राताल पिवळ्या शेपटीचा मासा आहे. हा मासा वापरुन केलेला टेरियाकी अँम्बरजॅक हा पदार्थ जपानमधे लोकप्रिय असला तरी जगभरात सर्वात जास्त शोधलेल्या पदार्थांच्या यादीत याचाही समावेश आहे.
Image: Google
7. टॉनजिरु: टॉनजिरु हे जपानी सूप आहे. यात मिसो अर्थात आंबवलेल्या सोयाबिनच्या बियांची पेस्ट वापरली जाते. त्यासोबतच या सूपमधे बटाटा, गाजर, बरडॉक नावाची वनस्पती वापरली जाते.
Image: Google
8. काढा: काढा हे भारतातील प्रसिध्द औषधी पेयं. काढा प्रामुख्यानं रोगप्रतिकाराशक्ती वाढवण्यासाठी लोकप्रिय आहे. कोरोनामुळे ही लोकप्रियता जगभरात पोहोचली. दालचिनी, मिरे, लवंगा, आलं असे मसाले वापरुन घरच्याघरी तयार केलं जाणारं पेय कसं तयार करायचं, ते पिल्यानं काय होतं याचा शोध जगभरातल्या लोकांनी गुगलवर घेतला.
गुगलवर भारतीयांनी शोधलेले पदार्थ
Image: Google
1. एनोकी मश्रूम: एनोकी मश्रूम हे प्रामुख्याने जपानी स्वयंपाकात वापरले जातात. रोगप्रतिकाराशक्ती वाढवण्यास उपयुक्त असलेले हे मश्रूम सलाड, नूडल्स यासारख्या पदार्थांमधे वापरले जातात.
Image: Google
2. मोदक : महाराष्ट्रातील प्रसिध्द गोडपदार्थ. जो प्रामुख्यानं गणपतीला नैवेद्य म्हणून केला जातो. मोदकांचे उकडीचे , तळणीचे, वेगवेगळ्या सारणांचे असे विविध प्रकार आहेत. हे प्रकार साधारणत: गणपती उत्सवाच्य दरम्यान सर्वात जास्त शोधले गेलेले आढळले.
Image: Google
3. मेथी मटर मलाई: सध्या हॉटेलमधे जेवायला गेलं की तिखट, मसालेदार भाज्यांसोबत थोडी गोडसर चवीची मेथी मटार मलाई ही भाजी अवश्य ऑर्डर केली जाते. उत्तर भारतातली ही भाजी आज संपूर्ण भारतात प्रसिध्द आहे. ताजी/ कोरडी मेथी, मटार, क्रीम यांचा वापर करुन अतिशय उत्कृष्ट चवीची ही भाजी तयार होते. ती रोटी, नान यासोबत चांगली लागतेच. शिवाय चपाती, फुलक्यांसोबतही खाल्ली जाते.
Image: Google
4. लसांजे: भारतीयांनी गुगलवरुन शोध घेतलेला लसांजे हा पदार्थ इटालियन आहे. मांस, भाज्या, चिज आणि सॉस वापरुन हा पदार्थ केला जातो.
Image: Google
5. पॉर्न स्टार मार्टिनी: नाव वाचून कोण्या पॉर्न स्टारचं नाव वाटेल हे ; पण हे एक पेयं आहे. पॅशन फ्रूटच्या चवीची कॉकटेल असून त्यात व्हॅनिलाचा स्वाद असतो, व्होडका , पॅशन फ्रूटचा ज्यूस, लिंबाचा रस, पॅशन फ्रूट पासून तयार केलेलं मद्य असतं. ही कॉकटेल ईशान्य इटलीतल्या पांढर्या वाइनसोबत घेतलं जातं.