Join us  

उन्हाळ्यात दूध लवकर नासू नये म्हणून ३ सोप्या-भन्नाट ट्रिक, दूध नासण्याची काळजी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 2:15 PM

Why does the milk spoil more easily in summer उन्हाळ्यात दूध काळजीने फ्रिजमध्ये ठेवलं तरी नासतं कधीकधी, दूध नासू नये म्हणून उपाय

उन्हाळा सुरु झाल्यानंतर, उष्णतेचा त्रास लोकांसह अन्न पदार्थांना देखील होतो. उन्हाळ्यात अन्न पदार्थ लवकर खराब होतात. सूर्य प्रकाश किंवा उष्णतेमुळे शिजवलेले अन्न आंबतात. मुख्य म्हणजे दूध फाटते किंवा नासते. काही लोकांकडे फ्रिज नसते, त्यामुळे दूध लवकर नासते. दूध तापवून घेतल्यानंतरही ते लवकर फाटते. दूध फाटल्यानंतर दुधाची खूप नासाडी होते.

काही लोकं नासलेल्या दुधाचे विविध पदार्थ करतात. पण अनेकदा नासलेल्या दुधातून उग्र वास येतो, ज्यामुळे त्याला फेकून देणे हाच पर्याय उरतो. दूध फाटू नये असे आपल्याला वाटत असेल तर, या काही टिप्स फॉलो करा. या ट्रिकमुळे अति उष्णतेतही दूध चांगले - फ्रेश टिकून राहेल, व खराब ही होणार नाही(Why does the milk spoil more easily in summer).

काचेची बाटली किंवा जगमध्ये ठेवा दूध

उन्हाळ्यात दूध फाटू नये असे वाटत असेल तर, दुधाला काचेच्या बाटलीत किंवा जगमध्ये साठवून ठेवा. या भांड्यांमध्ये दूध चांगले टिकून राहते. दूध साठवून ठेवण्यापूर्वी दूध उकळून थंड करा. नंतर थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवा. त्यावर कॅप किंवा झाकण लावायला विसरू नका. या ट्रिकमुळे ऐन उन्हाळ्यातही दूध फाटणार नाही.

दुधी भोपळा आवडत नसणाऱ्यांनाही आवडतील असे ‘दुधीचे घावन’; इतकं चविष्ट घावन कधी खाल्लं नसेल..

प्लास्टिक कॅन वापरा

दूध साठवण्यासाठी आपण प्लास्टिक कॅनचा वापर करू शकता. प्लॅस्टिक कॅनमध्ये दूध साठवण्यासाठी प्रथम दूध उकळून थंड करा. त्यानंतर त्यात दूध साठवून ठेवा. या ट्रिकमुळे दूध तीन ते चार दिवस आरामात टिकून राहेल, लवकर खराब होणार नाही.

हाय - हाय मिरची..चिरल्या-वाटल्यानंतर हातांची आग होते? ६ उपाय, काही मिनिटांत आग होईल कमी

स्टीलच्या भांड्यात दूध साठवा

दूध साठवण्यासाठी आपण स्टीलचे भांडे वापरू शकता. या भांड्यात दूध साठवून ठेवल्याने ते लवकर खराब होणार नाही. त्याचप्रमाणे दुधाची टेस्टही तशीच राहते, ती बदलत नाही. स्टीलच्या भांड्यात दूध साठवण्यापूर्वी स्टीलचं भांडं व्यवस्थित स्वच्छ करून घ्या.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स