बाहेर पाऊस पडत असला की चहासोबत मस्त गरमागरम , कुरकुरीत, खमंग पदार्थ खावेसे वाटतात. भजी वडे यासोबतच घरी फ्रेंच फ्राइज (homemade french fries) करुन खाल्ले जातात. पण घरी तयार केलेले फ्रेंच फ्राइज काही केल्या विकतसारखे कुरकुरीत आणि खमंग लागत नाही. तळल्यानंतर लगेचंच मऊ पडतात. त्यामुळे जास्त तेल सोडतात. फ्रेंच फ्राइजवर टाकलेला मसालाही ओलसर होतो. एकूणच घरात केलेल्या फ्रेंच फ्राइजचा पार विचका होवून मूडही जातो. नुसतं काहीतरी तेलकट आणि आरोग्यास अपायकारक खाल्ल्यासारखं वाटतं. हे सर्व होवू नये यासाठी घरी केलेले फ्रेंच फ्राइज कुरकुरीत (how to do crispy french fries like restaurant) व्हायला हवेत. फ्रेंच फ्राइज करताना काही सोप्या युक्त्या (tips for crispy french fries) केल्यास घरी केलेले फ्रेंच फ्राइजही रेस्टाॅरण्टसारखे कुरकुरीत होतील.
Image: Google
फ्रेंच फ्राइज कुरकुरीत होण्यासाठी
1. बटाटे उभे चिरुन पाण्यात एक तास भिजत ठेवावेत. पाण्यातून काढून कापड्यावर पसरवून ठेवून एक तास सुकवून घ्यावेत.
2. बटाट्याचे उभे काप पातळ चिरल्यास फ्रेंच फ्राइज कुरकुरीत होतात.
3. फ्रेंच फ्राइज करण्यासाठी बटाट्याची सालं काढून बटाटे थोडे उकडावेत. उकडलेले बटाटे हलकेसे तळून घ्यावेत. तळलेले बटाटे थंड झाल्यावर थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावे. ते थंड झाल्यावर त्याचे उभे काप करुन गरम तेलात चांगले तळून घ्यावेत.
Image: Google
4. बटाट्याचे काप तळताना गॅसची आच मंद असू नये. यामुळे तेल थंड होवून बटाट्याचे काप तेल पितात आणि मऊ होतात. बटाट्याचे काप तळताना गॅसची आच मध्यम किंवा मोठी हवी.
5. बटाट्याचे काप तेलात थोडेसे तळून बाहेर काढावेत. ते कागदावर पसरवून ठेवावेत. त्यावर काॅर्न स्टार्च भुरभुरावं. आणि मग हे काप पुन्हा गरम तेलात तळल्यास फ्रेंच फ्राइज म्स्त कुरकुरीत होतात.