खिचडी हा बहुतांश भारतीय लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. करायलाही अगदी सोपा. बरेच जण असेही आहेत की ते करायला शिकलेला स्वयंपाकातला पहिला पदार्थ म्हणजे खिचडी. गरमागरम खिचडी, त्यावर भरभरून टाकलेलं साजूक तूप आणि तोंडी लावायला एखादी लोणच्याची फोड किंवा चटणी असा मेन्यू जर ताटात असेल तर आणखी काय हवं.... ही खिचडी अतिशय बहुगुणी तर असतेच पण पचायलाही सोपी असते. त्यामुळेच तर खिचडी हा पावसाळ्यातला एक उत्तम पदार्थ मानला जातो. या दिवसांत पचायला हलके अन्न घेतले पाहिजे (benefits of eating khichadi). त्यात सगळ्यात अग्रेसर असणारा पदार्थ म्हणजे खिचडी (4 cooking tips to increase nutritional value of khichadi). आता ही खिचडी अधिक पौष्टिक कशी करायची ते पाहूया...(why khichadi is consider as a best food in monsoon?)
खिचडी खाण्याचे फायदे
१. आहारतज्ज्ञ शिल्पा अरोरा यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार खिचडी शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
पाळी अनियमित असेल- अगदीच कमी ब्लिडिंग होत असेल तर ४ बिया खा, पाळी नियमित येईल
२. मुगाची डाळ आणि तांदूळ या खिचडीतील दोन्ही प्रमुख घटकांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे ती पचनक्रिया तसेच चयापचय क्रिया चांगली होण्यासाठी फायदेशीर ठरते. ३. खिचडीतून आपल्याला प्रोटीन्स आणि फायबर मिळतात, ज्यामुळे बऱ्याच वेळ पोट भरल्यासारखे वाटते.
४. खिचडीवर आपण तूप टाकून खातो. त्यामुळे ती अधिक पौष्टिक आणि ॲण्टीऑक्सिडंट्स देणारी होते.
खिचडी पौष्टिक होण्यासाठी टिप्स
१. खिचडीमध्ये डाळ आणि तांदूळाच्या बरोबरीने हंगामी भाज्या घाला. त्यामुळे तिच्यातले पौष्टिक गूण अधिक वाढतात.
२. ताटात वाढल्यानंतर आपण खिचडीवर तूप घेतोच. पण ती करताना तेलाची फोडणी देण्याऐवजी तुपाची फोडणी द्या. यामुळे ती अधिक तर पाचक तर होतेच, पण शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी नॅचरल डिटॉक्स म्हणूनही काम करते.
लहान मुलांच्या केसांना कोणतं तेल लावावं? जावेद हबीब सांगतात मुलांचे केस चांगले होण्यासाठी १ उपाय
३. खिचडी नेहमी दही किंवा लोणच्यासोबत खावी. कारण त्यामुळे शरीराला अधिक चांगले प्रोबायोटिक मिळतात जे पचनक्रिया अधिक चांगली होण्यासाठी मदत करतात. तसेच खिचडीची पाचकता वाढवतात.
४. खिचडीमध्ये हिंग, जिरे तसेच इतर मसालेही टाकावेत. यामुळे खिचडीतील ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीसेप्टिक गुणधर्म आणखी वाढतात.